नक्षली हल्ला: आमदार भीमा मंडावी यांच्या आधी झाला होता पत्नीचा मृत्यू, नंतर मुलीची आत्महत्या

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदानाच्या दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आयईडी स्फोट घडवला.

भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा आज दुपारी निवडणूक प्रचार करुन श्यामगिरीहून जात होता. नक्षलग्रस्त परिसर असल्यामुळे दंतेवाड्यातील प्रचार ३ वाजताच संपला. भीमा मंडावी बुलेटप्रूफ गाडीत होते. त्यांच्या ताफ्यात सुरक्षा दलाच्याही गाड्या होत्या. त्यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला.

यात आमदार भीमा मंडावी यांना जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पाच जवानही शहीद झाले. भीमा मंडावी हे छत्तीसगड विधानसभेत भाजपचे उपनेते होते.

वैयक्तिक जीवनात केला अनेक संकटांचा सामना-

आमदार भीमा मंडावी हे अगोदर बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या मंडावी यांनी २००८ मध्ये महेंद्र कर्मा यांचा पराभव केला होता. दंतेवाडामधील हा हल्ला नकुलनार पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामगिरी क्षेत्रात झाला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. याच प्रचारासाठी भीमा मंडावी बैठका घेत होते.

राजकीय कामगिरीचा त्यांचा आलेख चढता असला तरी त्यानी वैयक्तिक जीवनात अनेक संकटाना तोंड दिलं होतं. २०१२ मध्ये मंडावी यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर पुढच्याच वर्षी कदाचित या दुःखातून त्यांच्या मुलीने आत्महत्या केली. मंडावी यांना त्यावेळी एक मुलगा होता.

त्यांनी पुढे २ वर्षांनी दुसरे लग्न केले. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मंडावी यांच्यामागे आता पहिला पत्नीचा एक मुलगा आणि दुसऱ्या पत्नीचे तीन असे एकूण ४ मुलं आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *