रजनीकांत बाळासाहेब ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करतो तेव्हा!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रासह देशभरातील जनतेचं खूप प्रेम होतं. बाळासाहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग देशभरात आहे. बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपटसृष्टी यांचं देखील एक वेगळंच नातं होतं. बाळासाहेबांच्या भाषणांना होणारी गर्दी तर अफाट असायची. बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी तर देवासमान होते.

बाळासाहेबांप्रमाणेच मराठमोळा असलेला आणि रजनीकांत हा देखील बाळासाहेबांप्रमाणेच प्रचंड चाहतावर्ग असणारा अभिनेता आहे. रजनीकांतला तामिळची जनता अक्षरशः देवासारखं मानते. त्यांच्यासाठी काही पण करायला ते तयार असतात. रजनीकांतच्या सिनेमांना तर तुफान गर्दी असते. जगभरात रजनीकांतचे ६६००० फॅन क्लब आहेत. रजनीकांत चा एखादा सिनेमा रिलीज झाला कि चाहते अभिषेक, पूजा आणि बरंच काही करतात.

तामिळचा देव ९ वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये रजनीकांत यांचा ‘रोबोट’ म्हणजेच तामीळ भाषेतला ‘एंद्रीयन’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्यावेळी रजनीकांतने बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण बाळासाहेबांच्या वेळापत्रकात त्यांच्या भेटीचं काहीही ठरलेला नव्हतं. पण बाळासाहेबांनी रजनीकांत साठी वेळापत्रक बदलून वेळ दिला. तो टाइम बाळासाहेबांच्या विश्रांतीचा होता. पण रजनीकांत भेटायला येणार असल्यानं त्यांनी दुपारची विश्रांती बाजूला सारली.

हा किस्सा खासदार संजय राऊत यांनी सांगितला होता. ते त्यावेळी मातोश्रीवर होते. ते तिथून निघत असताना बाळासाहेबांनी त्यांना थांबायला सांगितले होते. ‘एक मोठी व्यक्ती येणार आहे, भेटून जा’ असा सांगितले होते. पण कोण येणार, हे काही त्यांनी सांगितलं नव्हतं.

बाळासाहेबांनी ज्यावेळी पाहुणे कधी येणार म्हणून फोन केला त्यावेळी पाहुणे गेटवर आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यावेळी बाळासाहेब राऊत यांना म्हणाले २-३ मिनिटात पाहुणे येतीलच. रजनीकांत बाळासाहेब बसलेल्या खोलीत आले, तो क्षण राऊतांना अजूनही आठवतो.

सुपरस्टार असल्याचा कुठलाही बडेजाव नसलेला साध्या कपड्यातील रजनीकांतने बाळासाहेबांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि खणखणीत आवाजात जय महाराष्ट्र साहेब म्हणाला. या भेटी दरम्यान रजनीकांत जास्तीत जास्त मराठीतच बाळासाहेबांशी बोलला. दक्षिणेतला महानायक असलेले पन अगदी साध्या कपड्यांमध्ये. त्यांचं वागणं, बोलणं खूप साधं होतं,” असं राऊत सांगतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *