आईचे मागच्याच महिन्यात झाले होते निधन, दुःख बाजूला ठेवून जिंकवला मुंबईला सामना..

शनिवारी (दि.६) सनरायझर्स हैद्राबाद संघाला यांच्या घरच्याच मैदानावर नमवून मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादला ९६ धावांत गुंडाळूव मुंबईने ४० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अल्झारी जोसेफ यानं आपली कमाल दाखवत पर्दापणातच हैदराबादच्या सहा फलंदाजानं तंबूत पाठवले. या सामन्यात मलिंगाच्या जागी संधी मिळालेल्या अल्झारी जोसेफ यानं १२ धावांत ६ बळी टिपले. याबरोबरच त्याने IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजी केली.

अल्झारी जोसेफचा आयपीएलमधील हा पहिलाच सामना होता. ऍडम मिल्ने जखमी झाल्याने त्यांचा बदली खेळाडू म्हणून जोसेफला घेण्याचा सल्ला किएरॉन पोलार्ड आणि एविन लुईसने दिला होता. पण जोसेफला या सिजनमध्ये खेळण्याची संधी काही मिळाली नव्हती. अखेर कालच्या सामन्यात मलिंगा मायदेशी सराव स्पर्धा खेळण्यास गेल्याने जोसेफला संधी मिळाली. आणि याच संधीचे सोनं करत त्याने आयपीएल मध्ये एक इतिहास घडवला.

पहिल्याच चेंडूवर विकेट आणि आयपीएलमध्ये पदार्पणात सर्वाधिक सहा विकेट मिळवण्याची विक्रमी कामगिरी करणारा गोलंदाज असा पराक्रम केला. त्याच्या या सर्वोत्तम गोलंदाजीच्या बदल्यात मुंबईने मोठा विजय मिळवला.

मागच्याच महिन्यात आईचे निधन-

मागील महिन्यात वेस्ट इंडिज संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकला होता. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने मायदेशात इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला. पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या उद्देशाने वेस्ट इंडिज संघ मैदानात उतरला.

या सामन्यात देखील वेस्ट इंडिजने पकड मिळवली. दुसऱ्या डावात आघाडी घेण्यासाठी वेस्ट इंडिज मैदानात उतरणार होता. पण सकाळी सामना सुरु होण्यापूर्वीच अलझारीची आई शेरॉनचे रात्री निधन झाल्याची बातमी धडकली. त्यावेळी अलझारी दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. दोन्ही संघानी काळी पट्टी लावून दुःख दुःख व्यक्त केले.

वेस्ट इंडिजने ११९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर अलझारी जोसेफने ज्यो रूट आणि ज्यो डेन्ली यांची महत्वपूर्ण विकेट घेतली. यामुळे इग्लंडची दाणादाण उडाली आणि वेस्ट इंडीजने या सामन्यासह मालिकाही जिंकली. कर्णधार होल्डरने हा विजय अलझारीच्या आईला अर्पण केला होता.

मागच्याच महिन्यात आईचे निधन झालेल्या अलझारी जोसेफने काल आयपीएल मध्ये पहिलाच सामना खेळत रेकॉर्ड केला. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *