मतदान ओळखपत्र नसल्यास या कागपत्राच्या आधारे करता येते मतदान !

पुढील आठवड्यात भारतीय लोकशाहीचा उत्सव सुरु होत आहे. धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले. २०१९ ची निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष या दोन महिन्यात आकाश-पाताळ एक करणार आहेत.

निवडणुकीत मतदार हा राजा असतो. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोग आणि सामाजिक संस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मतदान करण्यासाठी तुम्हाला मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मदार म्हणून नोंदणी प्रत्यकाने करायला हवी. कारण मतदान हे केवळ आपले हक्क नसून मोठी जबाबदारी आहे.

मतदान करण्यासाठी भारतात मतदान ओळखपत्र देण्यात आलेले आहेत. परंतु अनेकदा मतदार यादीत नाव असून मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अनेकांना मतदान करण्यास अडचणी निर्माण होतात. यासाठी सरकारने मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. जर आपल्याजवळ मतदान ओळखपत्र नसेल तर दुसऱ्या कागदपत्राच्या आधारे मतदान करता येणार आहे.

मतदान करण्यासाठी पुरावा म्हणून खालील कागदपत्राचा वापर केला जाऊ शकतो-

१. पासपोर्ट-

यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी आणि नंतर काही सलग सुट्ट्या येत आहेत. त्या सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाणे टाळा. तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर तुम्ही पासपोर्टच्या साहाय्याने देखील मतदानाचा हक्क बजावू शकता.

२. ड्रायव्हिंग लायसन्स-

मतदानाची जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचा देखील वापर करू शकता.

३. बँक पासबुक-

मतदान करताना बॅंक पासबुकचाही वापर करता येतो. याची कित्येकांना कल्पना नाही.

४. पॅन कार्ड-

पॅनकार्डचा वापर केवळ आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी आपण करतो. पण तुम्ही मतदान ओळखपत्र नसल्यावर पॅन कार्डच्या साहाय्याने मतदान करू शकता.

५. आधार कार्ड-

मतदान करण्यासाठी आधारकार्ड हा पर्याय देखील तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *