४० वर्षांनंतर भारत असेल सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश! बघा किती आहे मुस्लिम लोकसंख्या..

सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या साधारणतः ८० टक्के आहे आणि ती २०५० पर्यंत ८८ टक्के होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्या वाढीचा वेग १.५ टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त ०.५ टक्के आहे. विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या जडणघडणीत भारताचा मोठा वाटा आहे.

जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि ती सन २०५० पर्यंत जवळजवळ ९०० कोटींपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन २०५० पर्यंत भारत चीनला मागे टाकू शकतो.

२०१७च्या सुरुवातीला जागतिक लोकसंख्या 7.6 अब्ज पर्यंत पोहचली आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १ अब्ज ३४ कोटी एवढी आहे. यामध्ये मुस्लिम लोकसंख्येचा हिस्सा २०११ च्या जनगणनेनुसार १४.२३ टक्के आहे. भारतात १७.२२ कोटी मुस्लिम राहतात. पुढील ४० वर्षांनंतर भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल, अशी आकडेवारी अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून समोर आली आहे.

सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत इंडोनेशिया प्रथम क्रमांकावर आहे. २०१५ च्या आकडेवारीनुसार, इंडोनेशियात २१,९९,६०,००० मुस्लिम धर्मीय वास्तव्यास आहेत. या यादीत सध्या भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात १९,४८,१०,००० मुस्लिम धर्मीय राहतात. पाकिस्तान या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

प्यू रिसर्चच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असेल; परंतु, तरीदेखील भारतात हिंदू हाच बहुसंख्य धर्म राहिल. २०५० सालापर्यंत जगात हिंदुची संख्या १३८ कोटी एवढी राहील.

प्यू रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०६० मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. २०६० मध्ये भारतात मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या ३३ कोटी ३० लाख ९० हजार इतकी असेल. यासह भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश ठरेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *