भाजपला मतदान करू नका, नसरुद्दीन शहासह ६०० कलाकारांनी केलं आवाहन..

२०१४ च्या निवडणुकीत बऱ्याच कलाकारांनी मोदींसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळेस देशभरात मोदी लाट बघायला मिळाली होती. पण यावेळेस मात्र मोदी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशभरातील नागरिक मोदींच्या पाच वर्षातील कामगिरीवर समाधानी नसल्याचे चित्र आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहांसह ६०० कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. मतदान करा आणि भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून बाहेर हाकला, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. या कलाकारांनी एक पत्रक जारी करून हे आवाहन केलं आहे.

या पत्रकावर नसिरुद्दीन शहा यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या सह्या आहेत.

भारतीय संविधान धोक्यात असल्याचे या कलाकारांचे म्हणणे असून त्यासाठी त्यांनी हे आवाहन केले आहे. १२ भाषांमध्ये हे पत्रक तयार करण्यात आले आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडीयाच्या संकेतस्थळावर हे पत्रक अपलोड करण्यात आलं आहे.

संविधानासोबतच भारतात सध्या गीत, नृत्य, हास्य आणि अभिनयहि धोक्यात असल्याचे या कलाकारांचे मत आहे. भाजप हा विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही लोकशाही प्रश्न, चर्चा आणि दक्ष विरोधी पक्षांशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळेच सर्वांनी भाजपला सत्तेतून हाकलण्यासाठी मतदान करायला हवं. कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून घालवा, संविधान वाचवा, असं आवाहनही या पत्रातून करण्यात आलं आहे.

याआधीही मलयाळम दिग्दर्शक आशिक अबू, आनंद पटवर्धन, सुदेवन, दीपा धनराज, गुरविंदर सिंह, पुष्पेंद्र सिंह आणि प्रवीण मोरछले यांच्यासह १०० हुन अधिक कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलं होतं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *