या चिमुकल्याचा फोटो मागची गोष्ट वाचून माणुसकीची ओळख पटेल!

चुका सगळ्यांकडून होतात. परंतु चुका झाल्यावर त्या दुरुस्त करणे सर्वांना जमत नाही. ज्यांना अशा चुका दुरुस्त करायला जमत नाही त्यांनी ही बातमी नक्की वाचा. मिझोरम मधील एक लहान मुलगा सायकल चालवत असताना चुकून त्याच्या सायकलला एक कोंबडीचे पिल्लु धडकले. चिमुकल्याला खुप वाईट वाटलं. त्याने जवळ जितके पैसे साठवले होते ते घेतले, कोंबडीच्या पिल्लाला उचलले आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी धावतपळत दवाखान्यात पोहोचला.

या लहान मुलाचा एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आला. त्यात तो लहान मुलगा कॅमेराकडे पाहत आहे. त्याच्या एका हातात कोंबडीचे पिल्लु आहे. तर दुसऱ्या हातात त्याने आतापर्यंत साठवलेली दहा रुपयांची नोट ! लहानग्याच्या डोळ्यात ज्या भावना आहेत त्या आपणालाही लिहून व्यवस्थित मांडता येणार नाहीत.

त्या दोन डोळ्यांमध्ये करुणा, कातरता, अपराधीपणा, दुःख हे सर्व दिसून येते. अद्भुत असा निरागसपणा आहे. फेसबुकवर सांगा सेझ नावाच्या एका व्यक्तीने एक पोस्ट करुन या मुलाची कथा सांगितली. त्याच्या पोस्टला ६५ हजार लोकांनी शेअर केले गेले आहे. त्यावर ८८ हजार लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

रोज किती वेगवेगळ्या बातम्या येतात. कोणी एखाद्याला गाडीने धडक दिली आणि रस्त्यावर त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून निघून गेले. लोक बाजुने पुढे निघून जात आहेत, परंतु कोणीही जखमींना मदत करत नाही. कोणी उपचाराअभावी रस्त्यावर तडफडून मेला. अशा बातम्या वाचताना वाटते आपण मुडद्द्यांच्या शहरात राहतो काय ? दुसऱ्या बाजूला या मिझोरमच्या चिमुकल्याचा फोटो पाहिला की माणुसकीची ओळख पटते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *