शोलेने केली ‘बाहुबली २’ पेक्षा जास्त कमाई ! शोलेच्या कमाईची किंमत आजच्या काळात किती?

सगळ्यांना माहित आहे अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. परंतु आम्ही आज आपल्याला त्यांची ही ओळख करून देण्यासाठी आलो नाही. ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्याविषयीच आहे पण तिची सुरुवात त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनपासून सुरू होईल.

असेच एकदा ट्विटरवर पोस्ट बघत असताना अभिषेक बच्चन याच्या मनात विचार आला की आपल्या पप्पाच्या चित्रपटांची कमाई तपासून बघूया. त्याने तरण आदर्शला टॅग करून “शोले” आणि “अमर अकबर अँथनी” या चित्रपटांनी केलेल्या कमाईबद्दल विचारले. थोडक्यात त्याला आजच्या तारखेला त्याची किंमत किती होईल ते बघायचे होते.

अमिताभ बच्चनच्या चाहत्यांनी लगेच कमेंट करून त्यांच्याशी संबंधित अनेक चित्रपटांच्या आकड्यांचा पाऊस पाडला. पहिले उत्तर अमिताभ बच्चनचा फॅन मोझेज सपीर याच्याकडून आले. त्याने सांगितले की १९८४ च्या पहिल्या १३ सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी नऊ चित्रपट एकट्या बच्चनचे होते. त्यात ‘शोले’ आणि ‘अमर अकबर अँथनी’ यांचा समावेश होता. ‘शोले’ हा सिनेमा पाच वर्षं थिएटरमध्ये चालू राहिला, तर ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट ७५ आठवडे दिवसाच्या तीन शो मध्ये चालला. पण त्याने हे अशा प्रश्नाचे उत्तर दिले होते, ज्याबद्दल कोणी विचारलेच नव्हते. तेव्हा अमिताभ बच्चन स्वतः मध्ये पडले आणि मोझेजला या चित्रपटांच्या कमाईबद्दल विचारले.

प्रतिसाद करायला त्यांचा दुसरा चाहता तिथे आला. आशिष पलोद नावाच्या व्यक्तीने सांगितले की, २०१७ मधील आजच्या तारखेच्या हिशेबाने १९७५ मध्ये आलेल्या “शोले” चित्रपटाने देशभरात १५०० कोटी आणि विदेशात ४१० कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच एकूण १९१० कोटी रुपये. तर १९७३ मध्ये आलेल्या ‘अमर अकबर अँथनी’ ने देशात ४८५ कोटी रूपये कमावले होते. यावरून आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या एकछत्री प्रसिद्धीची कल्पना येते.

२०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने २००० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. म्हणजे शोले ९० कोटींनी भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता होता राहिला. त्याबाबतीत मात्र ‘बाहुबली २’ ला त्याने चांगलेच मागे टाकले आहे. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाहुबली २’ ने भारतातून आणि जगभरात एकूण १८१० कोटी रुपये कमावले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *