दोघांचं प्रेम फुलत असतानाच होतो प्रियकराचा मृत्यू! बघा रिंकूच्या कागर चित्रपटाचा ट्रेलर..

नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कागर’ चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकायला रुपेरी पडद्यावर परतत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कालच प्रदर्शित झाला आहे. रिंकूच्या सैराटमधील अभिनयाने वेगळीच छाप पडली होती. या चित्रपटात तिने कसे काम केले आहे याची आता उत्सुकता आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. टीझरमध्ये प्रियकरावर अतोनात प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसं वागावं त्याचे धडे देताना दिसली होती. दोघांचं प्रेम फुलत असतानाच असं काही होतं की रिंकूच्या प्रियकराचा मृत्यू होतो आणि त्यानंतर रिंकूचा राजकीय प्रवास या चित्रपटात बघायला मिळणार आहे. रिंकू य चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांचे ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.

जागर हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बघा कागरचा ट्रेलर-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *