फेसबुकने उडवलेल्या पेजेस मध्ये भाजपचे कॉंग्रेस पेक्षा मोठे नुकसान!

लोकसभा निवडणुकीपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचे आराखडे बांधण्याच्या तयारीत सर्व पक्ष आहेत. पण भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये फेसबुकने काँग्रेसच्या आयटी सेल संबंधित ६८७ पेजेस हटवले आहेत. फेसबुककडे पेजेस संबंधी तक्रार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेसबुकने हि कारवाई केली आहे.

तसेच फेसबुकने पाकिस्तानी सैन्याशी संबंधीत कर्मचाऱ्यांचे 103 फेसबुक अकाऊंटही हटवले आहेत. या पेजेसच्या माध्यमातून आचारसंहितेदरम्यान खोटी माहिती आणि बातम्या पसरवण्यात आल्याने फेसबुकने ही कारवाई केली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामध्ये फेसबुकने पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केली आहे.

फेसबुकने पेजेस सोबतच काही अकाउंट देखील उडवले आहेत. या कारवाईचा फटका काँग्रेसला बसल्याची कालपासून चर्चा आहे. पण या कारवाईत सर्वात मोठा फटका भाजपला बसला असल्याची चर्चा सुरु आहे. कारण फेसबुकने केलेल्या कारवाईत सिल्वर टच या कंपनीचे देखील अनेक पेजेस हटवण्यात आले आहेत.

सिल्व्हर टच हि कंपनी भाजपशी संबंधित असल्याचे बोलले जाते. सिल्वर टच कंपनीच्या पेजेसवरून भाजपचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात येत होता. या कंपनीचे एक फेसबुक पेज, एक ग्रुप, एक इंस्टाग्राम असे एकूण २६ लाख फॉलोवर्स असलेले अकाऊंट उडवण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या पेजेसची किंमत ३९ हजार डॉलर म्हणजेच २७ लाख असल्याची माहिती आहे तर भाजपशी संबधित सिल्वर टच कंपनीच्या पेजेसची किंमत ७० हजार डॉलर म्हणजेच ५० लाखाच्या घरात आहे. या पेजेसच्या प्रमोशन साठी हे पैसे खर्च करण्यात आले होते. यामध्ये पहिली ऍड जून २०१४ मध्ये तर शेवटची ऍड फेब्रुवारी २०१९ मध्ये लावण्यात आल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

सिल्वर टच कंपनीचे भाजपशी काय आहेत संबध?

२०१७ मध्ये सिल्वर टच या कंपनीशी असलेले भाजपचे संबंध आयटीसेल प्रमुख अमित मालवीय यांनी नाकारले होते. पण या कंपनीविषयी अधिक माहिती घेतली असता संबंध असल्याचे उघड झाले आहे. सिल्वर टच कंपनीचे गुजरात सरकारमधील १७ वेगवेगळी खाती हि क्लाईंट आहेत. तसेच सिल्व्हर टच कंपनी सरकारच्या ४६ वेगवेगळ्या वेबसाईट मॅनेज करते.

एवढेच नाही तर सिल्व्हर टच या कंपनीने परराष्ट्र मंत्रालयासाठी आणि भारताच्या राष्ट्रपतींसाठी देखील काही ऍप बनवले आहेत. The India Eye हे भाजपचा प्रचार करणारं मोठं पेज यामध्ये उडवण्यात आलं आहे. भाजपाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तर काँग्रेसनेही अधिकृत एकही पेज उडालं नसल्याचा दावा केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *