या पाणीपुरीवाल्याचा मंथली प्लॅन बघून खवय्ये तुटून पडतात !

धर्मेंद्र सिंह, जिल्हा उज्जैन, मध्यप्रदेश ! अनलिमिटेड पाणीपुरी विकत असल्याच्या कारणामुळे हा भैया सध्या सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला आहे. धर्मेंद्र ३२ वर्षांचा असून उज्जैनच्या विक्रम युनिव्हर्सिटीमधून त्याने ग्रॅज्युएशन केले आहे. २०१८ उज्जैन कार्तिकी मेळ्यापासून धर्मेंद्रचा जिओ पाणीपुरी स्टॉल व्हायरल व्हायला सुरुवात झाली.

धर्मेंद्र उज्जैनच्या दसरा मैदान आणि स्टेशनच्या जवळील सेल्फी पॉइंट येथे १० रुपयांना ६ पाणीपुरी विकतो. पण त्याच्याजवळ पाणीपुरीचे काही अनलिमिटेड प्लॅन्स सुद्धा आहेत. १०० रुपये देऊन तीन तासात तुम्हाला हवी तितकी पाणीपुरी खाऊ शकता. धर्मेंद्रकडे आणखी एक योजना आहे. त्यामध्ये तुम्ही २००० रुपये देऊन महिनाभर संध्याकाळी ६ ते ९ या दरम्यान अनलिमिटेड पाणीपुरी खाऊ शकता. धर्मेंद्र सांगतो की बहुतेक लोक ३०-३५ पेक्षा 30-35 पेक्षा जास्त पाणीपुरी खाऊ शकत नाहीत. थोडेच लोक ५० च्या पार पर्यंत पोहोचतात आणि क्वचितच १०० च्या पार पोहोचतात. तरुणांमध्ये जास्तीत जास्त पाणीपुरी खाण्याबाबत पैज लागते. बरेच लोक पैसे वसूल करण्याच्या किंवा रेकॉर्ड बनविण्याच्या नादात पाणीपुरी वाया सुद्धा घालवतात.

धर्मेंद्रच्या डोक्यात जिओ पाणीपुरीचा विचार कसा आला ?

धर्मेंद्र गेल्या ८-९ वर्षांपासून पाणीपुरी किंवा गोलगप्पे व्यवसाय करत आहेत. ते आपल्या भावांसोबत मिळून व्यवसाय करतात. २०१७ मध्ये त्यांना जिओच्या अनलिमिटेड प्लॅनवरून अनलिमिटेड पाणीपुरीचा विचार डोक्यात आला. त्यांनी आपल्या व्यवसायाचे स्वरुप बदलले. धर्मेंद्र सांगतो की उज्जैनच्या २०१८ कार्तिक मेळ्यापासून माझा स्टॉल व्हायरल व्हायला लागला. रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणाऱ्या धर्मेंद्रने सांगितले की या ऑफरमुळे खवय्यांची गर्दी वाढली आहे.

कधी काली विकावी लागली होती इंडिगो कार !

धर्मेंद्रचे वडील शेतकरी होते. २०१५ मध्ये त्यांचा व्यवसाय ठीकठाक चालू होता,तेव्हा त्यांनी इंडिगो कार खरेदी केली होती. पण पुढच्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. आर्थिक तंगीमुळे ईएमआय भरता आला नाही. शेवटी गाडी विकणे पडी. आता धर्मेंद्रच्या व्यवसायाने परत गती घेतली असून धर्मेंद्रने त्यावर नवीन घर घेतले आहे.

कधीकाळी व्यवसाय बंद करायची इच्छा होती, आता वाढवण्याची इच्छा आहे

२०१६ मध्ये आर्थिक तंगीमुळे धर्मेंद्र खूप हलाखीत दिवस काढत होता. यादरम्यान त्याने सगळी आशा सोडून दिली होती. य्त्याने विचार केला की या व्यवसायात काहीच ठेवले नाही आणि हा व्यवसाय बंद करून आता काहीतरी नवीन केले पाहिजे. दरम्यानच्या काळात त्याच्या मनात जिओचा विचार आला. आता त्याच्या व्यवसायात वाढ होत आहे आणि त्याचीही वाढवण्याची इच्छा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *