निवडून आल्यावर खासदारकीचे मानधन शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी वापरणार हा उमेदवार!

सध्या लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे. सर्व पक्षाचे उमेदवार ठरले आहेत. जाती धर्मा वर राजकारण सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत होईल याविषयी सत्ताधारी बोलत नाही आहेत. शेतकरी वर्ग या नैसर्गिक संकटातून कसा बाहेर येईल यावर कुठे चर्चा होत नाही आहे. पण या निवडणुकीत काही असे उमेदवार आहेत जे शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलत आहेत.

चंद्रपूर हा महाराष्ट्रातील टोकाचा जिल्हा आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने विपुल असणारा हा जिल्हा योग्य नेतृत्व नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी वर्गाला कोणत्याही प्रकारचे फायदे पोहचू शकला नाही आहे. तसेच या जिल्ह्यात नेहमीच शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येत राहते. यावर उपाय कोणी काढला नाही पण आता यागोष्टी लक्षात घेऊन. शेतकऱ्यांचा मुलगा असणाऱ्या बाळूभाऊ धानोरकर यांनी चंद्रपूर येथील शेतकऱ्यांसाठी पीक विमा काढण्यासाठी खासदारकी मधून येणारे सर्व मानधन देण्याचा शब्द दिला आहे.

शेतकरी बांधवांचा पीक विमा काढून त्यांना एक प्रकारची सुरक्षा देण्याचा धानोरकर यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. शेतकरी कष्टकरी तरुण महिला यांच्या हक्क अधिकारावर लक्ष देऊन राजकारण समाजकारण करण्याची गरज आहे.

पण काही पक्ष धर्म जात यांच्या पलीकडे जायला तयार नाहीत. त्यांच्यासाठी धानोरकर यांनी चांगली चपराक लगावली आहे. बाळू धानोरकर हे काँग्रेस पक्षाकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मैदानात उतरले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *