पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, काँग्रेसकडून यांना मिळाली उमेदवारी!

संपूर्ण देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात सध्या पुणे येथील जागे बाबत तिढा सुरू आहे. काँग्रेसने अजूनही कोणताच उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे पुणे काँग्रेस कमिटी मध्ये संभ्रम आहे.

काँग्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत.आपआपल्या परीने सर्वजण तिकीट आणायला प्रयत्न करत आहेत. पुणे लोकसभा लढवण्यासाठी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे देखील इच्छुक होते पण काँग्रेस ने त्यांना तिकीट दिले नाही त्यामुळे त्यांनी भाजप नेतृत्वाशी जमवून घेतले.

काँग्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि सर्वात मजबूत दावेदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड आहेत. पण सध्या दोन नावाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे प्रविण गायकवाड व अरविंद शिंदे यांची त्यात प्रविण गायकवाड यांचे पारडे जड आहे त्यांनी पक्ष प्रवेश देखील केला आहे.

या नावाची चर्चा सुरू असताना दिल्लीमधून एक वेगळेच नाव पुणे लोकसभा साठी काँग्रेस कडून घेण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भगिनी प्रियंका गांधी या पुणे मधून काँग्रेस कडून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी सक्रिय काँग्रेस मध्ये काम सुरू केल्यापासून त्यांच्या साठी एक मतदारसंघ शोधण्यात येत होता आणि आज पुणे लोकसभा मतदार संघ आहे हे निश्चित झाले आहे.

त्यामुळे पुण्यमधील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार आहे. काँग्रेस चा पारंपरिक बालेकिल्ला असणारा पुणे लोकसभा प्रियंका गांधी ला कितपत साथ देतोय ते पाहणे औत्सुक्याचे आहे..

खासरे नेहमीच खास माहिती घेऊन येते पण आज एप्रिल फुल दिवस असल्याने वरील बातमी ही आपल्यासाठी एप्रिल फुल आहे. पुण्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे.

हे एप्रिल फुल आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *