हे आउट आहे का नॉट-आऊट? क्रिकेटमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे कोडे उलगडले !

क्रिकेट मधील बहुतेक नियम खूप सोपे आहेत. तर काही नियम अजबच असे आहेत. नियमांच्या बाबतीत भरपूर गोंधळही आहेत. फलंदाजाला कधी कधी आऊट देता येते याबाबतीत असाच एक गोंधळ अनेक दिवसांपासून क्रिकेट विश्वाला संभ्रमात टाकत होता. म्हणजे जेव्हा चेंडू स्टंपला लागून बेल्स पडतात तेव्हा की इतर कुठल्या स्थितीत ? उदाहरण द्यायचे झाल्यास अनेकदा असे होते की चेंडू स्टंपला लागतो मात्र बेल्स खाली पडत नाहीत, अशावेळी फलंदाजाला आऊट दिले जात नाही. आता हे कोडं आयसीसीने खूप सोप्या पद्धतीने सोडवलं आहे. चला तर आपणही समजून घेऊया.

फलंदाजाला दोनच स्थितीत आऊट दिलं जाईल. क्रिकेटच्या नियमपुस्तकातील नियमानुसार
एक – बॉल स्टंपला लागून बेल्स खाली पडायला हव्यात आणि

दोन – बॉल स्टंपला लागल्यावरही बेल्स पडल्या नसतील तर किमान एक स्टंप खाली पडायला हवा.

हे स्वाभाविक आहे की ऑफ स्टंप किंवा लेग स्टंप खाली पडल्यास बेल्स खाली पडणारच. परंतू असंही होऊ शकतं की मिडल स्टंप खाली पडूनही एकसुद्धा बेल्स खाली पडली नाही.

हे असंही समजून घेता येईल की, समजा एखाद्या फिल्डरने थ्रो फेकला आणि स्टंपवर बॉल लागून बेल्स खाली पडल्या. तेवढ्यात बॉल ओव्हरथ्रोला गेला आणि बॅट्समन रन घेण्यासाठी पळायला लागले. आता फिल्डरने परत त्याच एंडला थ्रो फेकला तर विकेटकीपर किंवा फिल्डर स्टंप उखडून आऊट करण्याचा प्रयत्न करतो. यावरुन स्पष्ट आहे की क्रिकेटच्या नियमांत एकतर बेल्स खाली पाडा किंवा स्टंप उखडा हाच नियम चालतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *