अभिनंदनचा फोटो वापरून पाकिस्तानच्या इन्स्टिट्यूटवाले हि एक गोष्ट मात्र विसरले!

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे एक असे नाव आहे जे पाकिस्तान कधीच विसरू शकत नाही. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अगोदर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या फायटर जेटनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. या जेटना पळवून लावताना अभिनंदनने आपल्या मिग 21 ने पाकिस्तानचे F16 ला पाडले होते. याची देशभरात चर्चा झाली होती. हे F16 पाडल्यानंतर अभिनंदन हे पाकीस्तानच्या हद्दीत उतरले होते. त्यानंतर पाकीस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते.

अभिनंदन ज्याप्रकारे पाकिस्तानमध्ये अडकले आणि त्यांनी ज्या बहादुरीने परिस्थितीचा सामना केला हर वेगळं सांगायची गरज नाही. संपूर्ण जगाने त्यांची बहादुरी बघितली.

ही घटनेला बरेच दिवस उलटून गेले असले तरी आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी राहिलेल्या दाण्याल गिलानी यांनी अभिनंदन यांचा एक फोटो ट्विट केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “On The Street of Multan”.

त्यांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर हा फोटो तिथे काय करतोय याची चर्चा सुरू झाली. पण त्या पोस्टर वर लिहिलेल्या एका कोपऱ्यातील शब्दांमुळे हा जाहिरातीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. त्या पोस्टरवर दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर संपर्क करून कोर्सबद्दल माहिती घेतली असता त्यांनी माहिती दिली आहे.

त्या व्हाट्सअप नम्बरवरून त्या इन्स्टिट्यूटची फेसबुक पेज लिंक देण्यात आली. त्यानंतर या इन्स्टिट्यूटबद्दल सर्व माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील मुलतानमध्ये टेक एट नेटवर्क नावाने इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटने अभिनंदनचा फोटो ब्रॅण्डिंग साठी वापरला आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर देखील अभिनंदनचा फोटो आहे. या इन्स्टिट्यूट मध्ये ५-६ कोर्स आहेत ज्यावर अभिनंदनची हि पोस्ट शेअर केल्यानंतर डिस्काउंट देखील देण्यात येत आहे.

त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिलेले आहे कि मार्केटमधील इन्स्टिट्यूट फक्त एक सामान्य जेट पायलट बनवतात. प्रोफेशनल मात्र ते बनवत नाहीत. त्यांच्या पोस्टरवर लिहिले आहे कि ‘प्रोफेशनल बन अभिनंदन ना बन’. अभिनंदनचे नाव इन्स्टिट्यूटने आपला बिझनेस वाढवण्यासाठी वापरल्याचे यातून सिद्ध झाले.

पण पाकिस्तानचे हे इन्स्टिट्यूट एक गोष्ट विसरले. ती म्हणजे अभिनंदन हे एक विंग कमांडर आहेत. त्यांनी सुखोई सोबत अन्य फायटर प्लेनदेखील उडवले आहेत. एक हजार तास उडवण्याचा अनुभव आल्यानंतरच नावाच्या समोर विंग कमांडर हा शब्द लागतो. त्यामुळे त्यांचा अशाप्रकारे अपमानजनक शब्द वापरून प्रसिद्धीसाठी फोटो वापरणे चुकीचे आहे. आणि पाकिस्तानने हे विसरू नये कि त्यांनी मिग 21 ने त्यांचे F16 देखील पाडले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *