टीपू सुलतानच्या बंदुकीच्या आणि तलवारीच्या लिलावात मिळाली एव्हढी किंमत!

टिपू सुलतान हा मैसूरचा शासक होता. १७९९ मध्ये सेरिंगपटम येथे युद्धात तो मृत्युमुखी पडला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी चे मेजर थॉमस हार्ट हे त्याचे शस्त्रास्त्रे सोबत घेऊन गेले होते. ब्रिटनच्या एका परिवाराला त्यांच्या तळघरात म्हैसूरचा शासक टीपू सुलतान याची हीच काही शस्त्रे सापडली होती. या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे. या परिवाराचे पूर्वज मेजर थॉमस हार्ट, ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत एक सेना अधिकारी होते. १७९८ ते ९९ मध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या अ‍ॅंग्लो-म्हैसूर युद्धानंतर काही कलाकृती आणि हत्यारे घरी घेऊन आले होते. त्यातीलच हे शस्त्रे आहेत.

टीपू सुलतानच्या वस्तूंचा बर्कशायरमध्ये तब्बल 107,000 पाऊंड मध्ये लिलाव करण्यात आला. यात टीपू सुलतानच्या ‘Silver-Mounted 2–Bore Flintlock Gun आणि Bayonet’ वर १४ बोली लागल्या. शेवटी या वस्तू ६०,००० पाऊंड(जवळपास ५४ लाख रुपये) मध्ये विकल्या गेल्या. हि बंदूक युद्धातूनच उचलून आणली अशा अवस्थेत आहे.

टीपू सुलतानच्या वडिलांची सोन्याची मूठ असलेली तलवार आणि Suspension Belt वर ५८ बोली लावण्यात आल्या होत्या. बंदुकीनंतर सर्वात जास्त बोली यावर लागल्या. या वस्तू १८,५०० पाऊंड (जवळपास १६,८३,२३१.०९) ला विकल्या गेल्या.

शस्त्रांसोबतच यात एका छोट्या संदूकाचाही लिलाव करण्यात आला. याला १७,५०० पाऊंड (जवळपास १५ लाख रुपये) इतकी किंमत मिळाली. पण भारताने यातील एकाही वस्तूची खरेदी केली नाही.

लंडन येथील भारतीय हाय कमीशनला India Pride Project प्रोजेक्टने या लिलावाची माहिती दिली होती. तर जगभरातील Volunteers ने लिलावातील वस्तूंची खरेदी करण्याची मागणी केली होती. Auction House ने लिलावाबाबत सांगितले की, ते कोणताही नियम तोडत नाहीयेत. आणि ज्या परिवारांना यातून पैसा मिळेल ते भारतातील एका शाळेला काही रक्कम दानही करणार आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *