का परिधान केला होता गौतम गंभीरने तृतीयपंथीयाचा वेश?

टीम इंडियाचा कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅट्समधील यशस्वी फलंदाज गौतम गंभीरनं काही दिवसांपूर्वी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. यापुढच्या काळातही खेळत राहण्याची उमेद संपल्यानेच आपण निवृत्तीचा विचार केल्याची भावना गंभीरनं व्यक्त केली होती. गौतम गंभीरने आज राजकरणात अधिकृत प्रवेश केला आहे. गंभीरने भाजपमध्ये आज अधिकृत प्रवेश केला आहे. गौतम गंभीर दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरनं 2003 साली ढाक्यात बांगलादेशशी खेळून वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2004 सालच्या नोव्हेंबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत कसोटी पदार्पण साजरं केलं. गंभीरनं आज वयाच्या 37 व्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समधून निवृत्ती स्वीकारली आहे.

गौतम गंभीर हा आपल्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. शानदार फलंदाजीमुळे भारतीय टीममध्ये दबदबा निर्माण केलेल्या गौतम गंभीरने सर्व क्रिकेट फॉरमॅट मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या क्रिकेटरचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते.

या फोटोंमध्ये गंभीरने डोक्यावर ओढणी आणि कपाळावर टिकली लावल्याची दिसत आहे. तृतीयपंथीयांच्या अवतारात गंभीर आपल्याला या फोटोमधून दिसत आहे. खासरेवर जाणून घेऊया गंभीरच्या या ड्रेस परिधान करण्यामागचे कारण काय होते…

तृतीयपंथी समाजाने आयोजित केलेल्या ‘हिजड़ा हब्बा’ या कार्यक्रमात गौतम गंभीरने उपस्थिती लावली होती. वायरल झालेले फोटो याच कार्यक्रमादरम्यानचे आहेत. गौतम गंभीर इथे पोहोचल्यानंतर तृतीयपंथीयांनी त्याला त्यांच्या सारखे तयार केले. या फोटोंची जोरदार चर्चा झाली होती. भेदभावाचा सामना करणाऱ्या तृतीयपंथी समाजाला समर्थन देण्यासाठी गौतम गंभीरने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. फोटो वायरल झाल्यानंतर त्याला काही जणांनी ट्रोल देखील केले. परंतु खरे कारण समजल्यानंतर सगळ्यांनीच गंभीरचं कौतुक केलं होतं.

काही दिवसांपूर्वी गंभीरने तृतीयपंथीयासोबत रक्षाबंधन साजरे केल्याचे फोटो टाकले होते. यात अभीना आणि सिमरन या तृतीयपंथीयांनी त्याला राखी बांधली होती. “ही पुरुष किंवा स्त्री असण्याची नाही तर माणूस असण्याची गोष्ट आहे.

तृतीयपंथी अभीना अहेर आणि सिमरन शेख यांनी राखीच्या रुपात माझ्या मनगटावर त्यांचं प्रेम बांधलं आहे. मी त्यांना अशाचप्रकारे स्वीकारलं आहे. तुम्ही पण असं करणार का?” असं गंभीरने त्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. गंभीर सातत्याने सामाजिक आणि देशाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आवाज उठवतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *