तीन महिन्यांचा पगार खर्च केला तरी हि भाजी विकत घेता येणार नाही..

जगात वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याबाबत आपण कल्पनाही करू शकत नाही. महागात महाग भाजी असा आपण विचार केला तर किती महाग विचार करू शकतो ? ५०० ते १००० रुपये किलो परंतु आपल्याला असे सांगितले कि एक भाजी अशी आहे ज्याची किंमत तब्बल ७६,००० रुपये किलो आहे तर आपल्याला विश्वास बसेल का ? नाहीना परंतु अशी भाजी अस्तित्वात आहे त्याबाबत आपण आज खासरेवर माहिती वाचूया,

एवढी महाग भाजी खाणे तर होणार नाही कमीत कमी याची किंमत तरी जाणून घेऊया तर हि भाजी आहे हॉप शूट Hop Shoots या भाजीची किंमत दिवसान दिवस आभाळाचे भाव गाठत आहे. युके मध्ये या भाजीची किंमत १००० युरो पर्यंत पोहचली आहे म्हणजे आजच्या भावानुसार तब्बल ७८,००० रुपये किलो एवढी आहे. जगातील सर्वात महाग भाजी मध्ये हि भाजी आहे. ते म्हणतात ना “भाजीत भाजी मेथीची ती माझ्या प्रीतीची” या मेथी एवजी हॉप शूट हे नाव वापरण्यास हरकत नाही. असो हा झाला विनोदाचा भाग आता बघूया हि एवढी महाग का ?

१२ महिने येणाऱ्या या भाजीची काळजी परंतु हिवाळ्यात या भाजीची जास्त काळजी घ्यावी लागते. दररोज सहा इंचापर्यंत या वनस्पतीची वाढ होते. सुरवातीला हिचे देठ जांभळ्या कलर मध्ये येतात नंतर हि भाजी नंतर हिरवी होती. वुमेन फिटनेस डॉट नेट अनुसार महिलांच्या तब्येती करिता अतिशय फायदेशीर असणारी हि भाजी आहे. मेनोपॉजची लक्षणे कमी करण्यास हि भाजी मदत करते. ज्या लोकांना चांगली झोप येत नाही त्यांच्या करिता हि भाजी फायदेशीर आहे असे सांगण्यात येते. पचन संस्थेचे प्रक्रिया सुधारण्या करिता या भाजीची मदत होते.

मुख्यतः हॉपशूट्स जंगल मध्ये येणारी वनस्पती आहे. हॉपशूट्सला लवकरच न कापल्यास त्याच्या फांद्या जाड होतात आणि त्यानंतर ती खाण्यालायक नाही राहत. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.
संदर्भ:- NDTV FOOD

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *