३ दहशतवाद्यांनी केला होता घरावर हल्ला, वाचा या १४ वर्षीय काश्मिरी तरुणाने काय केले?

जम्मू काश्मीर मधील शोपियां जिल्ह्यातील इरफान रमजान शेख याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १९ मार्च रोजी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इरफानला हा पुरस्कार त्याच्या शौर्यासाठी आणि त्याने दाखवलेल्या धाडसासाठी देण्यात आला आहे.

इरफानला शौर्यचक्र का देण्यात आले माहिती आहे का?

१६ ऑक्टोबर २०१७ रोजी तीन दहशतवाद्यांनी इरफानच्या घराला घेरले होते. ते इरफानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. इरफानला लक्षात आले कि दहशतवादी त्याच्या दारावर असून ते दरवाजा वाजवत आहेत. त्याने दरवाजा उघडला पण त्यांना घरात घुसण्यापासून रोखले. त्याच दरम्यान इरफान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला.

इरफानने त्यांना रोखले होते. त्यावेळी इरफानचे वय अवघे १४ वर्षे होते. इरफानवर त्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. पण त्यांना इरफानने देखील प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये इरफानने एक दहशतवादी ठार केला. ते बघून बाकीचे दोघे तिथून पळून गेले. या हल्ल्यात इरफानच्या वडिलांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

इरफानने वडील PDP पक्षाचे कार्यकर्ते होते. या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी इरफानच्या घराला आग लावण्यात आली होती. त्यानंतर इरफान आणि त्याच्या कुटुंबाने ते गावच सोडले.

इरफानला शौर्य पुरस्कार देण्यात आल्याचा फोटो राष्ट्रपतींच्या ट्विटरवर देखील टाकण्यात आला आहे. इरफानच्या या कामगिरीमुळे त्याच्या शौर्याचे देशभरात मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- तीन महिन्यांचा पगार खर्च केला तरी हि भाजी विकत घेता येणार नाही..
हे हि वाचा- शरद पवार साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला आले आणि त्याऐवजी आयटी पार्कची घोषणा केली !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *