देशातील पहिली शेतकरी आत्महत्या का व कशी झाली…

शेतकरी आत्महत्येच्या सत्राने महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. प्रशासन शेतकऱ्यांविषयी वेळकाढू धोरण आखत आहे लक्ष देत नाही प्रशासनास जाग आणण्याकरिता झाली होती पहिली शेतकरी आत्महत्या ज्याची नोंद आहे. तब्बल ३३ वर्ष झाली या घटनेला. घटना विदर्भातील आहे आज खासरेवर बघूया साहेबराव करपेंच्या सहकुटुंब आत्महत्येमागील वास्तव…

घरात श्रीमंती, गावाचे सलग ११ वर्ष सरपंच पद, उत्तम संगीत विशारद, भजनाच्या गायनाकरिता पंचक्रोशीत त्याचे नाव होते. साहेबराव करपे (चिलगव्हाण ता. महागाव जि. यवतमाळ) यांचा मोठा वाडा आजही पाहण्या लायक आहे. घरात येणाऱ्या जाणार्यांना नेहमी मदत करण्याची भावना असलेले करपे पाटील कुटुंब होते.

गावाचे कारभारी असल्याने प्रत्येक कार्यात ते पुढे राहत. परंतु शेतकर्यांना कधी अस्मानी संकट मारते तर कधी सुलतानी संकट असेच काही झाले. थकीत बिलापोटी एमएसईबीने वीजजोडणी खंडित केली. ४० पैकी १५ एकरांतील पोटऱ्यांपर्यंत आलेला गहू-चणा वाळला अन्‌ सोबतच साहेबरावांची स्वप्नेही करपलीत. कर्ज फेडण्याच्या चिंतेने ते सैरभैर झाले. मनाने खचले. दोन्ही पती-पत्नीने काहीतरी मनाशी ठरवले व मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले.

करपे पाटील नेहमी वर्धेला मनोहर कुष्ट्धामात येत असे. त्याही दिवशी ते तसेच आले दिवस होता १९ मार्च १९८६ चा पत्नी व आपल्या चार मुला सहित ते मनोहर कुष्ट्धामात आले. तिथे खोली घेतली त्यानंतर हार्मोनियम आणि टाळ घेऊन बराच वेळ ते सहकुटुंब भजन गात होते. घरून सोबत आणलेल्या स्टोववर पत्नीने भजे केली परंतु या भज्यात होते जहर स्वतः त्यांनी त्यात एन्ड्रीन मिसळले. मुलांना भजे खायला दिले. एक-एक करीत चारही मुलांनी व पाठोपाठ पत्नीनेही जगाचा निरोप घेतला.

हे झाल्यानतर साहेबराव करपे यांनी शेतकर्यांची हलाखीची स्थिती एका चिठ्ठीत वर्णन करून लिहली. आपण का हा निर्णय घेत आहोत या बाबत त्यांनी सविस्तर लिहले यामध्ये तसेच दोन मुले, दोन मुली (लहान मुलगी सात-आठ महिन्यांचीच होती) व पत्नीच्या मृत्यूचा घटनाक्रमही लिहिला. खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून त्यांच्या कपाळावर त्यांनी एक-एक रुपयाचे नाणे ठेवले.

आपल्या आत्महत्येमुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून कोणी या प्रकरणात अडकू नये म्हणून साहेबराव करपे यांनी दाराबाहेर दगडाला दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीच्या वरच्या भागातच त्यांनी कुणीही दार उघडू नये, पोलिसांना कळवावे, असे लिहून ठेवले होते. आणि शेवटी त्यांनी स्वतः ती भजे खाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

आपल्या आत्महत्येने सिस्टीम हालेल, असे साहेबरावांना वाटत होते; पण तसे काही न घडले नाही. उलट शेतकरी आत्महत्यांच्या साखळीने महाराष्ट्र आजही ग्रासलेला आहे. साहेबराव करपे यांनी शेतकर्यांच्या समस्यांना पहिल्यांदा बोलके केले. १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवसाचा उपवास १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवसाचा उपवास अनेक लोक मागील वर्षी पासून ठेवत आहेत. त्यांचे पुर्ण गाव या दिवशी सुतक पाळते.

साहेबराव करपे व मालती करपे यांना खासरे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *