कामसुत्र अनुसार खरा पुरूष असा असतो!

कामसुत्राला केवळ एक लैंगिक शिक्षण देणारी हस्तपुस्तिका मानणे हा त्या पुस्तकावरील अन्याय आहे. संभोगाच्या ६४ स्थितींशिवाय हे पुस्तक सभ्य समाजात कसे राहायचे हे देखील शिकवते. वात्स्यायन यांनी महिला आणि पुरुषांच्या सामाजिक वर्तनासाठी काही नियम लिहले आहेत. कामसुत्रानुसार आदर्श पुरुष कसा असतो ते वाचा :

१) प्रौढ झाल्यानंतर पुरुषाला शिकलेल्या लोकांमध्ये बसले उठले पाहिजे. त्याच्या घराच्या जवळ पाणी भरण्याची व्यवस्था असली पाहिजे जेणेकरुन घरात नेहमी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. घरात बगीचा जरुर असला पाहिजे. घर दोन भागांत विभागलेले असले पाहिजे. बाहेरचा भाग पाहुण्यांसाठी आणि आतील भाग महिलांसाठी.

२) पाहुण्यांना भेटायच्या खोलीमध्ये म्हणजेच ड्रॉईंग रुममध्ये एक बिछाना असावा ज्यावर पांढऱ्या रंगाची चादर असेल. खोलीत सुगंधी फवारा जरुर मारावा, म्हणजेच खोलीत फुलांचा सुगंध दरवळत ठेवावा. खोली सुगंधी फुलांनी सजवावी. पाहुण्यांसाठी तबकात पान ठेवलेले असावे. खोलीत फलक, कागद, रंग आणि कुंचले असावेत, जेणेकरुन मोकळ्या वेळात चित्र काढता येतील. वाचण्यासाठी पुस्तके असावीत आणि खेळण्यासाठी कवड्या वगैरे खेळाचे साहित्य असावे.

३) सकाळी उठल्यानंतर पुरुषाने चांगल्या प्रकारे दात घासले पाहिजेत. रोज अंघोळ केली पाहिजे. अत्तर लावले पाहिजे. ओठ लाल ठेवण्यासाठी पान खाल्ले पाहिजे. अंघोळ करताना बगला जरुर स्वच्छ कराव्यात. हे लिहले आहे कामसुत्रात. चार दिवसात एकदा दाढी केली पाहिजे.

४) पुरुषाने दिवसांत तीन वेळा खाल्ले पाहिजे. दुपारच्या जेवणानंतर मनोरंजनात वेळ व्यतीत केला पाहिजे. मित्रांना भेटले पाहिजे आणि विनोदी लोकांसोबत राहिले पाहिजे. म्हणजे संगत चांगली असली पाहिजे.

५) पुरुषांनी समवयस्क महिला आणि पुरुषांसोबत गप्पा मारुन वेळ व्यतीत केला पाहिजे. गप्पामध्ये जर एका व्यक्तीने कुठल्या कवितेची एखादी ओळ ऐकवली तर दुसऱ्याने पटकन ती ओळ पकडुन ती पुर्ण केली पाहिजे. या पद्धतीने एकमेकांचे ज्ञान तपासले पाहिजे. मैफिलीत महिलांनी पुरुषांना दारु घेण्यास सांगितले पाहिजे. पुरुषांनी दारुसोबत तिखट आणि आंबट चकना खाल्ला पाहिजे.

(कामसुत्र, लांस डेन)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *