असे झाल्यास टोल नाक्यावर पैसे देऊ नका म्हणून व्हायरल झालेला मेसेज निघाला खोटा..

टोलनाक्यांवर (Toll Tax Rule) वाहनचालकांकडून टोलवसुली केली जात असली तरी हा टोल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालकांचा तासनतास या रांगांमध्ये खोळंबा होता. एखाद्या व्यक्तीचे नुकसान हे केवळ ने केवळ त्याच्या अज्ञानामुळे होत असते. अनेकांना गर्दी, तासनतास वाहानांच्या रांगेत उभे राहणे हे सवयीचे होऊन गेलंय.

कितीही त्रास झाला तरी एक ब्र ही न काढता मुकाट्याने आपला रस्ता नापायचा हेच काय ते आपले नशीब. पण एका ठिकाणीमात्र ह्या सगळ्याचा बांध फुटतो आणि तो म्हणजे टोल नाका. टोलनाक्याविषयी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

काय आहे व्हायरल मेसेजमध्ये?

“महाराष्ट्रातील कुठल्याही टोल नाक्यावरती जर आपणास ताटकळत उभा राहावे लागले तर काय करावे? असा प्रश्न अनेकदा पडतो, यावर उत्तर सापडलं आहे. टोल बूथ पासून शंभर मिटर चा एक पिवळा पट्टा आखलेला असतो जर वाहनांची रांग या पिवळ्या पट्याच्या बाहेर गेली तर, शंभर मिटर पट्याच्या बाहेरील सर्व वाहने मोफत सोडावीत. तसेच पिवळ्या पट्ट्याच्या आत 3 मिनीटा पेक्षा जास्त वेळ लागला तर ही आपण टोल भरून नये. असा राज्य शासनाचा आदेश आहे. या नियमाचे उल्लंघन टोल कर्मचारी करत असतील तर, पोलीसांशी संपर्क साधून लिखीत तक्रार टोल कंपनी विरोधात करावी. असे कित्येक नियम, सवलती असतील ज्या अपणापर्यंत योग्य मार्गाने पोहोचत नसतील अथवा त्या पोहोचू दिल्या जात नसतील. इथे नुसते डोळे नाही तर मनदेखील उघडे ठेवावे लागेल. असो, तर पुन्हा कधी तुम्ही पिवळ्या पट्टीच्या मागे अडकलात तर विश्वासाने गाडी गियरमध्ये टाका आणि भुर्रर्रकन निघून जा. कोणताच माईकालाल तुम्हाला अडवणार नाही.”

काय आहे सत्यता-

याबाबत माहिती घेतली असता हि माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याविषयी खुलासा केलेला आहे. यामध्ये असा कोणताही नियम अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहेत.

यावरून टोलनाक्यावर तुम्हाला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर टोल भरु नये असा कुठलाही नियम नाही हे सिद्ध होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- मार्केटमध्ये मासे खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखावे ?
हे हि वाचा- पाकिस्तानी चहावाल्याने का लावला विंग कमांडर अभिनंदनचा फोटो?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *