सिनेमाचं तिकीट ऑनलाईन बूक करताना तुम्हाला अशाप्रकारे लुटलं जात आहे!

आजकाल सर्व कामं डिजिटली करण्यावर अनेकांचा भर असतो. डिजिटल माध्यम वापरून पैश्यांचे व्यवहार तर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी डिजिटल माध्यम वापरण्याकडे आजकाल सर्वांचा कल असतो. त्यात सिनेमाचं तिकीट म्हणलं कि ते तर ऑनलाईन बुक करणेच सर्वजण पसंत करतात. पण हेच सिनेमाचं तिकीट बुक करताना तुम्हाला लुटलं जात आहे याचा अंदाजा तुम्हाला आहे का? नाही ना. बघूया कशाप्रकारे सिनेमाचं तिकीट ऑनलाईन पद्धतीनं बुक करताना आपल्याला लुटलं जातं.

मोबाईल ऍप किंवा वेबसाईटवरुन सिनेमाचं ऑनलाईन तिकीट बूक करताना काही शिल्लकचे पैसे घेतले जातात. इंटरनेट हँडलिंग चार्जेसच्या नावाने हे पैसे घेतले जातात. पण हे पैसे घेणे वैध आहे का? तिकीट बूक करताना इंटरनेट हँडलिंग फी भरण्याची गरज नसल्याचं ‘आरटीआय’मध्ये समोर आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आणली आहे. इंटरनेट हँडलिंग फीच्या नावाने सर्वांची लूट कंपन्या करत आहेत. ‘फोरम अगेन्स्ट करप्शन’चे अध्यक्ष विजय गोपाल यांनी हैदराबादेतील ग्राहक कोर्टात धाव घेतली आहे. बूकमायशो, पीव्हीआरविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे.

ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी उकळण्याचा अधिकार चित्रपट तिकिटांचं ऑनलाईन बूकिंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना नाही, असं रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

इंटरनेट हँडलिंग फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्कम उकळल्याचा आरोप अनेक प्रेक्षक करतात. त्यामुळे सिनेमाच्या तिकीटाची मूळ रक्कम जर दोनशे रुपये असेल, तर इंटरनेट हँडलिंग फीमुळे ही रक्कम २३० रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *