मस्जिदीत झालेल्या हल्ल्यात बाल बाल बचावलेल्या बांगलादेशच्या क्रिकेट टीमचा काय होता अनुभव?

न्यूझीलंडमधील साऊथ आइसलँड शहरात २ मस्जिदीत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप व्यक्तींचे प्राण गेले. या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. क्राईस्टचर्च मधील आलं नूर मस्जिदीत हा हल्ला झाला. हा हल्लेखोर बंदूक घेऊन मस्जिदीत घुसला आणि गोळीबार केला. या व्यक्तीने या हल्ल्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या फेसबुक अकाउंटवर केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्लेखोराने १७ मिनिटं या हल्ल्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या फेसबुक अकाउंटवर केले. या व्यक्तीचे नाव ब्रेंटन टैरंट असल्याची माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय ब्रेंटन टैरंट हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. या हल्लेखोराने अगोदर आपली कार डीन अवेन्यू मध्ये अल नूर मस्जिदीजवळ पार्क केली. त्यानंतर त्याने गाडीतून बंदूक काढली. आणि मस्जिदीत घुसून गोळीबार सुरु केला.

हा व्यक्ती आर्मीच्या ड्रेसमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या गाडीत अनेक हत्यार असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तर त्याने २-३ वेळा बंदूक रीलोड केल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. या हल्लेखोराने अगोदर एक ७४ पानांचे घोषणापत्र देखील जाहीर केले होते. यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘ मी मुस्लिमांचा द्वेष करत नाही, पण त्या मुस्लिमांचा द्वेष करतो जे आमच्या जमिनीवर ताबा करून धर्म परिवर्तन करत आहेत.

धक्कादायक म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा बांगलादेशचा संपूर्ण संघ त्याच मस्जिदीत होता. या हल्ल्यात बांगलादेशचा संघ थोडक्यात बचावला. हल्ल्याच्या ३-४ मिनिटांपूर्वीच बांगलादेशचे खेळाडू तिथे पोहचले होते. टीम मॅनेजर खालिद मशुद यांनी सांगितले कि आमचे नशीब बलवत्तर म्हणून आम्ही हल्ल्यात सापडलो नाहीत. तेथील दृश्य हे एखादा सिनेमासारखे होते.

अनेकजण मस्जिदीतून रक्तबंबाळ होऊन बाहेर पळत येत होते. त्यावेळी संघ बसमध्ये होता. सर्वजण बसमध्ये खाली बसले होते. संघ मस्जिदीत पोहचणार होताच तेव्हाच गोळीबार सुरु झाल्याचं ते म्हणाले. खेळाडूंनी बसमधुन नंतर सुरक्षित बाहेर पडण्यात यश मिळवलं आणि पार्कमधून ते बाहेर सुरक्षित ठिकाणी पळाले.

बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बालने ट्विट करून सांगितले कि, ‘ ते सर्व काही भयानक होतं. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करा.’ न्यूझीलंड आणि बांगलादेश संघात टेस्ट सिरीज सुरु होती. १६ मार्चपासून तिसरा सामना खेळला जाणार होता. पण या हल्ल्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *