गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

देशाचे माजी सरंक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या होत्या.

मात्र, ही अफवा आता खरी ठरली आहे. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.
रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांचा रक्तदाब कमालीचा कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. मागील अनेक दिवसांपासून मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती.

शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारी त्यांची प्रकृती नाजूक असल्याची बातमी आल्यानंतर त्यांच्या घराबाहेर खूप गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. त्यांच्यावर अमेरिकेसह, मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत जास्तच बिघडत गेली.

मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या नाकात नलिका असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री कामकाज देखील सुरूच ठेवले होते. एक सच्चा राजकारणी, सर्वसामान्याचा नेता,साधी राहणी उच्च विचारसरणीचा पाईक, एक महान राष्ट्रभक्त अशी त्यांची सर्वसामान्यात ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

गोमंतकांचा लाल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *