दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या नेत्याच्या डोक्यात मुलाने फोडलं अंडं! व्हिडीओ व्हायरल..

न्यूझीलंडमधील मस्जिदीत झालेल्या हल्ल्यात ४९ नागरिकांना प्राण गमवावे लागले. मूळचा ऑस्ट्रेलियाचा असलेला ब्रेंटन टैरंट याने क्राइसचर्च मस्जिदीत अंदाधुंद गोळीबार केला. संपूर्ण जगभरात या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्लेखोराने हल्ल्यापूर्वी एक घोषणापत्र जाहीर केले होते ज्यात त्याने लिहिले होते कि आमच्या देशात आमच्या जागांवर ताबा करून धर्मांतर करून राहणाऱ्यांचा मला राग आहे.

या हल्ल्यानंतर अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. पण हल्लेखोर हा ऑस्ट्रेलियाचा असल्याने तेथील लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणे महत्वाचे होते. ऑस्ट्रेलियातील एका नेत्याच्या प्रतिक्रियांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार वायरल झाला आहे. ऑस्टेलियातील नेता असलेले फ्रेजर एन्निंग हे न्यूझीलंडमधील हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया देत होते.

फ्रेजर हे या हल्ल्याचे समर्थन करत होते आणि तो का झाला हे समजून सांगत होते. पत्रकारांना ते याविषयी बाईट देत होते. पण तेवढ्यात तिथे एक मुलगा येतो जो आपल्या मोबाईलमध्ये फ्रेजर यांचे शूटिंग मागून करत असतो. तो १५ वर्षीय मुलगा फ्रेजर यांच्या डोक्यात अंडं फोडतो. फ्रेजर हे त्या मुलाला तिथेच मारहाण करायला लागतात.

सिनेटर फ्रेजर हे त्यावेळी सांगत होते कि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मुस्लिम लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे लोकं मुस्लिमांवर अशाप्रकारे हल्ला करण्यास मजबूर होत आहेत. मुलाने हे रेकॉर्ड करत त्यांच्या डोक्यात अंडं फोडलं. फ्रेजर यांनी रागात त्याला चापट मारली आणि लाथा मारायला लागले. पण पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले.

बघा व्हायरल व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *