हे होते शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचे शेवटचे शब्द..

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन दहशदवाद्यांसोबत लढताना शहीद झाले होते. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर २७ नोव्हेंबर ला ताज हॉटेलमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्‍यासाठी संदीप हे एनएसजी कमांडोजच्या टीमचे नेतृत्त्व करत होते.

मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या एका साथीदाराला वाचवून ते आपल्या टीममधील साथीदारांना शेवटचे शब्द बोलून गेले होते. “तुम्ही सगळे नका येऊ, मी सांभळून घेईल” एवढे बोलून संदीप यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या शब्दांमुळे त्यांच्या ट्रूप कमांडोजवर प्रचंड परिणाम झाला.

काय घडलं होतं २७ नोव्हेंबर २००८ रोजी-

ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एनएसजीच्या कमांडोनी ऑपरेशनला सुरुवात केली. संदीप या १० जणांच्या टीमचे नेतृत्व करत होते. त्यांच्या टीमला तिसऱ्या मजल्यावर दहशतवादी असल्याचा संशय आला. तिथे त्यांनी एका खोलीत काही महिलांना बंधक बनवले होते. त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. तो दरवाजा तोडताच त्यांच्या टीमवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला.

संदीप आणि टीमला प्रत्युत्तर देताना बंधक बनवलेल्या महिलांना सुद्धा गोळी लागणार नाही याची काळजी घावी लागणार होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप यांचे साथीदार सुनील यादव जखमी झाले. संदीप यांनी त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवले.

पण त्याचदरम्यान त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागली. तरीसुद्धा त्यांनी दहशतवाद्यांना पाठलाग केला. गोळीबार करणाऱ्या दशवाद्यांना शोधून ठार केले. जेव्हा ते पुढे गेले तेव्हा दहशतवादी लोकांना खोलीत बंद करून मारत होते. संदीप यांनी तेथून चौदा लोकांना बाहेर काढले. पण दहशतवाद्यांनी पाठीमागून गोळीबार केला ज्यात ते गंभीर जखमी झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. त्यांच्या टीमचे ऑपरेशन यशस्वी करून ते शहीद झाले.

संदीप उन्नीकृष्णन हे ७ व्य बिहार रेजिमेंटचे जवान होते. संदीपचे वडील हे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होते. संदीप यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि संदीप हे त्यांची पूर्ण पगार गोरगरिबांना दान करायचे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *