हा विक्रम आपल्या नावावर करत हिटमॅन रोहित शर्मा बनला जगातील तिसरा क्रिकेटपटू..

काळ दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मालिकेतील पाचवा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर विजय मिळवत मालिका एक्या खिशात घातली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत दमदार पुनरागमन केले. आणि शेवटचे तीन सामने जिंकून मालिका जिंकली.

या वन डे सामन्यात सर्वात वेगवान ६००० धावा करणाऱ्या सलामीवीराचा मान पटकावणाऱ्या रोहित शर्मानं बुधवारी आणखी एक विक्रम नावावर केला. त्याने वन डे क्रिकेटमध्ये ८००० धावांचा पल्ला पार करताना माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहितने ७४ चेंडूंत ४ चौकारांसह अर्धशतकही झळकावले. वन डे क्रिकेटमधील त्याचे हे ४१ वे अर्धशतक ठरले.

रोहितने जलद ८००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गंगुलसह संयुक्त तिसरे स्थान मिळवले आहे. सर्वात जलद ८००० धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने १७५ डावात हा पल्ला गाठलेला आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स १८२ डावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर रोहितने २०० डावात हा पल्ला गाठून गांगुलीसह संयुक्त तिसरे तहान पटकावले आहे.

काल झालेल्या पाचव्या वन डे सामन्यात विजयासाठी भारताला २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. सलामीवीर शिखर धवन (१२) त्वरित माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघावर दडपण आले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने भारताला पहिला धक्का दिला, परंतु त्यानंतर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितनं या सामन्यात १३वी धाव घेताच नावावर एक विक्रम नोंदवला, त्यानं या कामगिरीसह महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला यांचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावले.

या सामन्यात रोहितनं सलामीवीर म्हणून सर्वात जलद ६००० धावांचा विक्रम नावावर केला. त्यानं १२१ डावांत हा पल्ला गाठला. आमला आणि तेंडुलकर यांना हा पल्ला गाठण्यासाठी अनुक्रमे १२३ व १३३ डाव खेळावे लागले.

ऑस्ट्रेलियाने या वन डेत ३५ धावांनी विजय मिळवून मालिका ३-२ नं खिशात घातली. ऑस्ट्रेलियाच्या २७२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ २३७ धावांत तंबूत परतला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *