अनेक दिवस जेलमध्ये राहुन बाहेर आल्यावर राजपाल यादवने सांगितले तेथील हे अनुभव..

बॉलिवूड चित्रपटांमधून आपल्याला नेहमी खळखळून हसविणाऱ्या विनोदी अभिनेता राजपाल यादवच्या आयुष्यात नुकताच एक डाऊनफॉल आला होता. इंदोरच्या सुरेंदर सिंह नावाच्या व्यक्तीकडून राजपालने २०१० मध्ये “अता पता लापता” चित्रपटासाठी पाच कोटी रुपये उसने घेतले होते आणि त्याबदल्यात सुरेंदरला मुंबईमधील एक्सिस बँकेचा चेक दिला होता.

सुरेंदरने हा चेक जेव्हा २०१५ मध्ये बँकेत जमा केला तेव्हा तो बाऊंस झाला. याबद्दल सुरेंदरने राजपालला कायदेशीर नोटीस बजावली आणि त्याच्यावर केस दाखल केली. या प्रकरणात कोर्टाने राजपालला तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगुन राजपाल नुकताच बाहेर आला आहे. या काळात जेलमध्ये त्याला काय अनुभव आले ते त्याने सांगितले आहे. वाचुया राजपालच्या शब्दात…

“…आपण विचार करतो तसेच आयुष्यात घडेल असं काही नसतं. पण एक्या आयुष्यात जे काही घडतं त्यामधुन काही ना काही शिकायला मिळते असे मी मानतो. चित्रपटात काम करत असताना माझा प्रयत्न हाच असतो की, ३ वर्षांपासून ८० वर्षाचा कोणताही माणूस असो, माझा चित्रपट बघितल्यावर त्याच्या ओठांवर हसू उमटेल. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताभिसरण चांगलं होईल आणि माझं त्याच्याशी रक्ताचं नातं निर्माण होईल.

कोणत्याही व्यक्तीला संघर्ष करावाच लागतो. संघर्ष हा संघर्ष असतो. त्यात कमीजास्त असे काही नसते. आपण सुपरस्टार असलो तरी ते पद कायम ठेवण्यासाठीही संघर्ष आलाच. उलट माझ्या मते तो संघर्ष नसून तेच जीवन आहे आणि आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. हसवणं हे माझं काम आहे, त्यासाठीच माझा जन्म झाला आहे. मला त्यात आंनद वाटतो.

आपला देश आहे, त्यात एक कायदा आहे. आपण सर्वांनी त्याचे पालन करायला हवे. आपला बॉलीवूड सिनेमा शंभर वर्षांपासुन सुरु आहे. तो एकतर गुंतवणूकीवर किंवा कर्ज काढुन केला जातो. फ्रॉडगिरीवर कोणताही सिनेमा निघत नाही. कुणी पैसे लावत असतो. कुणी चित्रपट बनवत असतो. तर कुणी तो प्रसारित करत असतो. माझ्याबाबतीत जो प्रसंग घडला त्यात असे नाही की मी ५० जणांकडुन पैसे घेतले. मी एकाच ठिकाणाहून पैसे घेतले आणि माझे स्वतःचेही गुंतवले. आपण साधं घरासाठी कर्ज घ्यायचे म्हणलं तरी कितीतरी बारकाईने तपासतो. पण मी एवढं खोलात जाऊन पाहिलं नाही. आज २० वर्षांनंतर मात्र मला कळलं की आपल्या फॅनला ऑटोग्राफ देणं आणि एखाद्या एग्रीमेंटवर सही करणं या खुप वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

मी १३व्या वर्षी अभिनय सुरु केला. ३३ वर्ष झाली मी अभिनय करतोय. आता ३ महिने मी तुरुंगात होतो. परंतु जीवन चलने का नाम है असं समजून मी थांबलो नाही, थकलो नाही की वाकलो नाही. परवानगी घेऊन जेलमध्येच “राजपाल की पाठशाला” सुरु केली. ती खुप मनोरंजक होती. पाठशाळेचे सगळे विद्यार्थी खुप चांगले होते. आधी मला सेलेब्रिटी म्हणुन ते भेटायला यायचे. माझ्या बऱ्याच मुव्ही त्यांनी पाहिल्या होत्या. पण १-२ दिवस माझ्यासोबत घालवल्यानंतर तेच म्हणायचे पडद्यावरील राजपाल आणि प्रत्यक्षातील राजपाल खुप वेगळा आहे.

एखादा सेलेब्रिटी जेलमध्ये जातो तेव्हा मिडीयामधुन अनेक उलटसुलट चर्चा होतात. परंतु मी मिडियाचे आभार मानीन त्यांनी माझ्याबाबतीत असे काही केले नाही. माझ्या घरी माझी पत्नी, मुलगी आहे. माझ्या मुलगी माझ्याबद्दल विचारायची तेव्हा तिच्या आईने तिला चुकीचे काही सांगितले नाही. माझी मुलगी हीच माझी अशी एकमेव गर्लफ्रेंड आहे जिला मी खुप मिस करत होतो. जजेलमध्ये असताना आयुष्याची पन्नाशी पुर्ण केल्यावर काय करायचे हे ठरवायला मला वेळ मिळाला. त्या दिशेने आता मला वाटचाल करायची आहे…”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *