सिएसटी जवळ पादचारी पुल कोसळुन तीनठार, हे आहे कारण…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिला व एक पुरुष मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जाहिद खान, अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40) अशी मृत महिलांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

जखमींना सायन, सेंट जॉर्ज, जीटी, कामा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. ढिगार्‍याखाली अनेक जण अटकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ रस्ता बंद केला. त्यामुळे मुंबईहून दादरच्या दिशेने जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

“हा पूल रेल्वेच्या अखत्यारित येतो. आम्ही तीन-चार वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून पुलाचं ऑडिट करण्याची मागणी केली होती. ते पत्रही आमच्याकडे आहे. त्यामुळे या दुर्घटनेचा जाब रेल्वे प्रशासनाला विचारायला हवा,” असा आरोप इथल्या स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.

हा पूल रेल्वेने बांधला,पण त्याची देखरेख महानगरपालिका करते. पुलाचे ऑडीट झाले होते मात्र त्यात मायनर रिपेरिंग सांगितले. दरवर्षी याची डागडुजी करणे महत्त्वाचे असते पण हे पूर्ण न झाल्याचेही कळत आहे. जुन्या पुलांच्या यादीत हा पूल असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या यादीत या पूलाची माहिती नव्हती असेही कळते आहे. हा पूल ब्रिटीश कालीन असून याची डागडूजी झाली नव्हती.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील विशेष माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *