अभेद्य मेहरानगढ किल्ला आणि ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेला सोनेरी महाल!

मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे. १४६० साली जोसवणाऱ्या राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे.

शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहेत. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते. किल्यावरुन शहराकडे नजर टाकल्यास शहरातील निळ्या रंगाची घरे नजरेत भरतात. किल्यामध्ये राजघराण्याचे संग्रहालय आहे व आजही जतन केलेला सोनेरी महाल आहे. हा महाल ८० ते १०० किलो सोन्याने मढवलेल्याचा अंदाज आहे.

किल्ल्यात अनेक सुंदर महाल आहेत. या महालात मैफिली वगैरे पार पडत. मोती महाल, शिश महाल, फुल महाल, सिलेह खाना, दौलतखाना असे अनेक महाल बघण्यासारखे आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच किरात सिंह सोडा या किल्ल्याचे रक्षण करताना धारातीर्थी पावलेल्या सैनिकाची छत्री आहे. प्रवेश करून आत गेल्यावर जयपूरच्या सैन्याने हल्ला करताना बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भिंतीवरील भोके तसेच एक निखळून पडलेला दरवाजा अजूनही दिसतो.

किल्ल्याला भव्य असे सात दरवाजे आहेत. दुधाकांग्डा पोळ, अमृत पोळ, गोपाल पोळ आणि भेरू पोळ असे एकूण सात दरवाजे या गडाला आहेत. महालातील संग्रहालयात पुरातन पालख्या, हौदे, पाळणे, शस्त्र, कपडे, लघु चित्रे यांचे संग्रह आकर्षकपणे मांडलेले आहेत.

कोणी बांधला हा किल्ला?

राव जोधा या राजाने मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. राठोड घराण्याचा राव रणमल याच्या २४ मुलांपैकी एक म्हणजे राव जोधा. राठोड वंशीय राजे स्वतःला सूर्यवंशी समजत असल्याने सूर्याच्या (मिहीर – सूर्याचे एक नाव) नावाने ‘मिहीर गढ’ असे नाव ठेवले, जे पुढे अपभ्रंश होऊन ‘मेहरानगढ’ असे झाले.

मेहरानगढ किल्ल्यासमोर ‘जसवंत थडा’ या नावाचे जोधपुर राजघराण्यातील राजांचे संगमरवरी स्मारक आहे. हा किल्ला सुमारे ६० कोटी वर्षापूर्वी बनलेल्या ज्वालामुखीय खडकावर बनलेला आहे. बाकुचीरीया टेकडीचा ७२ एकराचा भाग ‘राव जोधा वाळवंटिय वन’ म्हणून संरक्षित केले आहे.
-समीर इंगवले

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *