कार्यकर्त्यांच्या घरचे पिठलं भाकरी नेत्यांना का आवडते ?? काय आहे यापाठीमागील खरं कारण

निवडणुका तोंडावर आल्या आहेत नेत्यांच्या गाठी भेटी प्रचाराच्या निमित्ताने सुरू झाल्या आहेत. त्याच निमित्ताने अनेक नेते आपले जेवण कार्यकर्त्यांच्याकडे करताना आपण पाहत आलो आहोत. नेते कार्यकर्त्यांच्या घरी आल्यानंतर पिठलं भाकरी बनवण्यासाठी सांगतात.त्याच्या पाठीमागे काय कारण आहे असा कधी आपल्याला प्रश्न पडला नसेल पण या मागे पण एक कारण आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

आर आर पाटील असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील यांचे कार्यकर्त्यांच्या घरातील पिठलं भाकरी खाण्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. लोकनेते हे त्याचमुळे कार्यकर्त्यांच्या हृदयावर राज्य करत असतात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, कांशीराम जी हे नेते सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करत आलेत .अनेक सामाजिक चळवळीतील नेते हि सामान्य कार्यकर्त्यांकडे पातळ भाकरीचा आस्वाद घेतला आपण पाहिले आहेत.

गोपीनाथराव मुंडे हे संघर्षशील नेतृत्व नेहमीच त्यांच्या नशिबी संघर्ष आला आहे. त्यांनी सरकारच्या विरोधात अनेक यात्रा आंदोलने केली आहेत. महाराष्ट्रभर फिरत असताना मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला जाण्याऐवजी ते नेहमी कार्यकर्त्यांच्या घरी जेवायला जाणे पसंद करायचे.आणि कार्यकर्त्यांच्याकडे पिठलं भाकरी असे साधेच जेवण घ्यायचे.

यापाठीमागे काय कारण आहे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सांगितले होते कि कार्यकर्त्यांच्या घरी जेवायला जाताना कधी कधी नेत्यांसोबत अधिकचे माणसे पण असतात. यागोष्टीचा ताण घरातील महिलामंडळी वर पडू नये म्हणून त्यांना बनवायला सोपा असणारा स्वयंपाक म्हणजे पिठलं भाकरी हा बनवायला सांगितला जातो. पिठलं बनवण्यासाठी लागणारे बेसन प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असते आणि भाकरी टाकायला हि सोपी जाते. म्हणून हि लोकनेते कधी सामान्य कार्यकर्त्यांकडे गेली तर पिठलं भाकरी आवर्जून मागतात..लोकनेत्यांच्या पिठलं भाकरी जेवणापाठी मागे हा एक व्यापक दृष्टिकोन असतो

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- अत्यंत कमी कपडे घालणाऱ्या सिंगापूर मध्ये रेपचे प्रमाण नगण्य का ? वाचा
हे हि वाचा- आचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *