या कारचा टॅक्सच तब्बल ४५ कोटी रुपये आहे तर किंमत किती असणार?

Bugatti La Voiture Noire ही कार जगातील सर्वात महागडी आणि सर्वात वेगवान कार आहे. या कारला फ्रान्सची सुपरकार बनवणारी कंपनी बुगाती (Bugatti)ने बनवलं आहे. यावर्षी झालेल्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही कार प्रदर्शित करण्यात आली. पण आश्चर्याची बाब म्हणजे शोरूममध्ये येण्याआधीच या कारला मालक सुद्धा मिळाला आहे.

या कारकडे जगातील सर्वात महागडी कार म्हणून बघितले जात आहे. एका अज्ञात व्यक्तीने या कारला खरेदी केलं. या कारची किंमत तब्बल ८७ कोटी रुपये आहे. पण हि गाडी ऑन रोड १३३ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

हि कार अवघ्या काही मिनिटातच या व्यक्तीने घेतली आहे. पण तो कोण आहे याची माहिती अजून बाहेर आलेली नाहिये. या गाडीला टॅक्सच तब्बल ४५ कोटी रुपये लागला आहे. यापूर्वीही अनेक सुपरकार मार्केट मध्ये आल्या असून या कारकडे सर्वात महागडी कार म्हणून बघितले जात आहे. खासरेवर जाणून घेऊया या कारबद्दल..

काय आहे या कारची विशेषतः-

Bugatti La Voiture Noire हि सुपर स्पोर्ट्स कार २.४ सेकंदात १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या गाडीला १०० किमी अंतर कापण्यासाठी ३५.२ लिटर पेट्रोल लागणार आहे. तसेच या गाडीचा सर्वाधिक वेग ४२० किमी प्रति तास आहे.

या कारची डिझाईन ५७SC Atlantic या गाडीवरून बनवण्यात आलं आहे. या कारचं डिझाईन बुगातीचे संस्थापक एटोर बुगाती यांचा मुलगा जीन बुगातीने केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- २०१४ च्या मोदींच्या विजयात महत्वाची भूमिका असलेल्या प्रशांत किशोर यांनी का सोडली मोदींची साथ
हे हि वाचा- आचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *