२०१४ च्या मोदींच्या विजयात महत्वाची भूमिका असलेल्या प्रशांत किशोर यांनी का सोडली मोदींची साथ

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवले. भाजपा आणि मित्रप्रेक्षाचे बहुमताचे सरकार दिल्लीत स्थापन झाले. २०१४च्या निवडणुकीत मोदी आणि भाजपच्या यशाचे बरेचसे श्रेय प्रशांत किशोर यांना दिले जाते. भाजपच्या त्या दणदणीत विजयामागचा चाणक्य म्हणून त्यांना ओळखले जाते.

राजकीय रणनिती ठरवण्यात माहीर असलेले पिके उर्फ प्रशांत किशोर यांचा जन्म बिहारमधील बक्सरचा. प्रशांत किशोर यांनी भारतीय राजकारणात येण्यापूर्वी संयुक्त राष्ट्रासाठी ८ वर्ष काम केले आहे. २०११ साली ते गुजरातला आले. त्याच दरम्यान त्यांची गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत ओळख झाली. त्यांनी २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींसाठी काम केले.

त्यांनी थोड्याच दिवसात एक प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख मिळवली. पुढे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. २०१४ मधील निवडणुकांना त्यांनी मोदी लाटेत परावर्तित केले. चाय पे चर्चा, थ्री-डी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन आणि सोशल मीडियाच्या इतर सर्व संकल्पना त्यांच्याच होत्या.

पण पुढे डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी मोदींची साथ सोडली. त्यानंतर ते नितीश कुमार यांच्या गोटात सामील झाले. २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा उत्तम रणनीती आखून बिहार मध्ये नितीश कुमार यांचे सरकार स्थापन केले. त्यांनी नितीश कुमार यांच्या सर्वच गोष्टी चांगल्याप्रकारे ब्रॅण्डिंग करून लोकांमध्ये पोहचवल्या, ज्याचा त्यांना खूप फायदा झाला.

का सोडली मोदींची साथ-

प्रशांत किशोर हे केंद्रात एक नवीन संस्था बनवू इच्छित होते. यासाठी दोन मोठ्या कंपन्यांबरोबर करार देखील झाले होते. हि संस्था पंतप्रधान कार्यालयासोबत थेट काम करणार होती. प्रतिभावान असलेल्या तरुणांना थेट केंद्र सरकार सोबत काम करता येणार होते. प्रशांत किशोर यांच्या मते सरकारी नोकरी न करणारे असे अनेक लोक बाहेर बसलेले आहेत ज्यांच्यात खूप प्रतिभा आहे. अशांना ते थेट केंद्र सरकारची नोकरी याद्वारे देऊ इच्छित होते.

या प्रोजेक्टवर प्रशांत किशोर यांनी २०१२ मध्ये वर्षभर काम केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण करू असे आश्वासन त्यांना दिले होते. यावर बरेचसे काम देखील झाले होते. बराच खर्च देखील या प्रोजेक्टवर करण्यात आला होता. पण हा प्रोजेक्ट करण्यात दिरंगाई होत असल्याचे प्रशांत किशोर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मोदींना सोडण्याचा निर्णय घेतला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *