आताची मोठी बातमी : पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खानचं एन्काऊंटर..

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात वापरण्यात आलेली कार आणि त्याच्या मालकाचा शोध लागला होता.

त्यानंतर आज सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याचा आणि त्याच्या दोन साथीदारांचा सैनिकांनी खात्मा केला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्रालमधील चकमकीत मुदस्सिर अहमद खान आणि इतर दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. हे तेघे दहशतवादी एका घरात लपून बसले होते.

सैन्याने केलेल्या कारवाईत तिघेही ठार झाले असून ते लपून बसलेलं घर देखील उध्वस्त झालं आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हि चकमक झाली.

मुदस्सिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. मुद्दस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता, असं बोललं जातं. मुदस्सिरच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवलेली आहे. अद्याप फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

पुलवामात राहणारा २३ वर्षीय मुदस्सिर इलेक्ट्रिशन होता. तो पदवीधर होता. हल्ल्यात ज्या वाहनाचा वापर झाला होता, ते वाहन आणि स्फोटकांची व्यवस्था मुदस्सिरनंच केली होती. त्रालमधील मीर मोहल्ल्यात राहणारा मुदस्सिर २०१७मध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डारच्या सातत्यानं संपर्कात होता. आदिलनंच स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडकवली होती. डिसेंबर २०१७मध्ये चकमकीत नूर मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्राली हा मारला गेल्यानंतर मुदस्सिर हा १४ जानेवारी २०१८ रोजी घरातून पसार झाला होता. त्यानंतर तो ‘जैश’मध्ये सक्रिय झाला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *