आचार संहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे…

काल लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता देखील लागू केली जाते. निकाल लागेपर्यंत ती लागू असते. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत काल निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. पण अनेकदा आपल्या मनात प्रश्न येतो कि आचारसंहिता लागू झाली म्हणजे नेमके काय झाले. आचारसंहितेबद्दल खूप कमी लोकांना सविस्तर माहिती असते.

खासरेवर जाणून घेऊया आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणती कामे होत नाहीत…

निवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही. कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.

सत्तेत असलेला पक्ष राजकीय फायद्यासाठी अनेक कामे निवडणुकीच्या तोंडावर करू शकतो. पण आचारसंहितेमुळे सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही, ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल. तसेच धार्मिक स्थळांचा वापर देखील निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही.

आचारसंहिता नसती तर त्याचा फायदा सत्तेत असलेल्या पक्षाला झाला असता. आचारसंहितेच्यामंत्र्यांना शासकीय दौऱ्यांच्या वेळी निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. कुठल्याही मंत्र्यास प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा इतर वस्तूंचा वापर करता येत नाही. तसेच मतदान केंद्रांवर विनाकारण गर्दी जमवता येणार नाही.

उमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली बंधनं असतात. कुठलीही राजकीय सभा, संमेलन आणि रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. सरकारी बंगला किंवा सरकारी पैशांचा वापर प्रचारासाठी करता येत नाही. राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्य असते.

आचारसंहितेच्या महत्वाचे म्हणजे कुठल्याही व्यक्तीकडे 50 हजारांपेक्षा अधिक रोकड किंवा 10 हजार रुपयांपेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते. यापैकी एखाद्या नियमाचे उमेदवाराने उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करू शकतो. उमेदवाराच्या विरोधात एफआयआर देखील दाखल केला जाऊ शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *