छत्रपती संभाजी महाराजांचा इंग्रजांवर कसा दरारा होता, एकदा अवश्य वाचा…

१६८१ च्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी जंजीरा किल्ला जिंकून घेण्यासाठी दंडाराजपुरीला वेढा घातला होता, हा वेढा ऑगस्ट १६८२ पर्यंत सुरु होता. जंजीराचा वेढा चालू असतानाच छत्रपती संभाजी महाराज यांनी इंग्रज आणि पोर्तुगीज यांना समुद्रावरुन घालवण्याचे ठरवले होते.

मराठ्यांनी आपले लोक सर्वत्र ठेवल्यामुळे इंग्रजांना धान्यही महाग मिळत होते. इंग्रज ज्या पेचात अडकले होते त्यासाठी सिद्दीला मुंबईत ठेऊ नये असे इंग्रजांना वाटत होते, छत्रपती संभाजी महाराजांच्या भीतीने मुबंईकरांनी सुरतेला कळवले होते की

“सिद्दी येथेच पावसाळा काढणार असेल तर आपल्याला चौकी पहारा वाढवायला पाहिजे. संभाजी राजांकडून सिद्दीवर केंव्हा छापे येतील त्याकडे जागता पहारा ठेवून लक्ष ठेवावे लागेल. संभाजीराजे सिद्दीवर फार चिडलेले आहेत. आपल्याच रहिवाशांना पुरेसे धान्य नाही. मग आम्ही त्यांच्या माणसांना धान्य कुठून पुरवावे ? काही तरी करून पावसाळ्यात सिद्दी मुंबई बंदरात न राहिला तरच आम्हाला संभाजीराजांशी शांततेने व मैत्रीने राहता येईल ” हे पत्र दिनांक १९ जानेवारी १६८२ रोजीचे आहे.

मुंबईकर इंग्रज हे छत्रपती संभाजी महाराजांच्या दबावाने भीत होते पण सुरतकारांच्या दुटप्पी धोरणामुळे त्यांना सिद्दीविरुद्ध ठोस पाऊल उचलता येत नव्हते. मुंबईकरांच्या या पत्रावरून छत्रपती संभाजी महाराजांचा मुंबईकर इंग्रजावरील दबदबा दिसून येतो. जंजिरा सारखा अवघड किल्ला घेण्यात छत्रपती संभाजी महाराज अपयशी ठरले असले तरी हा लढा कौतुकास्पद होता यात शंका नाही…

साभार – राज जाधव बार्शी

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *