या कारणामुळे अमित, राज ठाकरेंचे भाषण कार्यकर्त्यांसोबत उभं राहून ऐकतो..

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. पक्षाच्या विविध सामाजिक उपक्रमांना त्यांची उपस्थिती भविष्यातील राजकीय संकेत देतात.

गेल्या वर्षभरापासून अमित ठाकरे भेटी-बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. राज ठाकरे आणि मनसेच्या राजकीय भूमिकांचे समर्थक, ‘दगलबाज राज’या पुस्तकाचे लेखक कीर्तीकुमार शिंदे सध्या अमित ठाकरे यांच्या कार्यक्रमांचे निरीक्षण करत आहेत. अमित यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि मनमिळावू आहे. समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं आणि सार्वजनिक जीवनातील वावर आश्वासक आहे.मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना अमित यांनी राजकारणात सक्रीय व्हावं असं वाटतं.

राज ठाकरेंचे भाषण म्हणजे तुफान गर्दी परंतु अमित ठाकरे हे आपल्या वडिलांचे भाषण उभे राहून ऐकणे पसंद करतात. त्यामागे काय विशिष्ठ कारण आहे हे आज आपण बघूया, कालच्या भाषणात अमित ठाकरे हे कार्यकर्त्यासोबत उभे दिसले. १३ व्या वर्धापनदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार? हे ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते आले होते.

यामुळे रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांची इतकी गर्दी होती की तळ मजल्यावर मोठा स्क्रिन लावून देखील अनेक कार्यकर्ते रस्त्यावरच उभे होते. सभागृह तर अक्षरशः पूर्णतः भरून गेले होते. मात्र अमित ठाकरे जेव्हा सभागृहात आले तेव्हा त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. पुढच्या रांगेत बसलेल्या अभिजित पानसे यांनी अमित यांना बसण्यास सांगितले. पण हॉलमध्ये अनेक कार्यकर्ते उभे असल्याने अमित ठाकरे यांनी देखील उभं राहूनच राज ठाकरेंचे भाषण ऐकलं.

कालच झालेल्या कार्यक्रमात नाहीतर नेहमी अमित ठाकरे आपल्याला कार्यकर्त्या सोबत उभे राहून किंवा बसून भाषण अथवा पत्रकार परिषद बघताना दिसतात. मुळात याचे कारण असे कि पक्षामध्ये कार्यकर्त्यांचे स्थान मोठे, अशी अमित ठाकरेंची भूमिका आहे आणी त्या गोष्टीचे ते पालन करतात. आपल्याला हि गोष्ट आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *