तुला पाहते रे मालिकेत सुबोध भावे ऐवजी प्रसाद ओक यांची एन्ट्री होणार का ?

झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरू होते आणि ‘रात्री जागो मोहन प्यारे’ मालिकेपर्यंत प्रेक्षक आनंदात हे कार्यक्रम बघतात. ‘लागिरं झालं जी’, ‘तुला पाहते रे’ असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.

वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी ‘तुला पाहते रे’ ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरले आहे.

लग्नानंतर विक्रमचे खरे रूप प्रेक्षका समोर आल्याने अनेक प्रेक्षक नाराज झाले आहेत. आणि यावरून अनेकांनी असा तर्क लावला आहे कि सुबोध भावे आता मालिका सोडणार आहे. याचे स्प्ष्टीकरण सुबोध भावे यांनी मागेच दिले आहे कि ते मालिका सोडणार नाही परंतु आता नवीन तर्क लावण्यात येत आहे कि सुबोध भावे एवजी प्रसाद ओक मालिकेत येणार आहे.

कारण सुबोध भावे मालिकेत सोडून गेले आहेत आणि परवा जेव्हा परत एन्ट्री होईल तेव्हा प्रसाद ओक असणार असे बोलल्या जात आहे. परंतु या सर्व गोष्टी अफवा आहेत यावर विश्वास ठेऊ नये. मालिकेत अजून खूप काही इंटरेस्टिंग घडणार आहे असे कळविण्यात आले आहे. सुबोध भावेंनी देखील एका मुलाखतीत सांगितले कि मालिकेत अचानक खूप मोठा वळण येणार आहे.

आणि आपण सुध्दा हीच अपेक्षा करू कि मालिकेत आणखी चांगल्या गोष्टी दाखविण्यात येईल. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *