कडकनाथ पेक्षाही दुर्मिळ आणि महाग आहेत ह्या कोंबड्याच्या जाती…

आपल्याकडे सध्या कडकनाथ मासाहारी प्रेमी आवडीचा विषय झाला आहे. काळ्या रंगाचा हा कोंबडा अनेक रोगावर प्रतिकारक आहे असे सांगण्यात येत आहे. २००० रुपये किलो पर्यंत याचा भाव पोहचला होता. अनेक भागात कडकनाथचे पोल्ट्री फार्म देखील सुरु करण्यात आले आहे. खासरे आज आपल्याला जगातील काही असेच दुर्मिळ आणि महागड्या कोंबड्या बद्दल माहिती देणार आहेत.

कडकनाथ हा मायब्रा मेलेनोसीस या जेनेटीक कंडीशन मुळे काळे होतात असे सांगण्यात येते. आता बघूया या पेक्षाही काही वेगळ्या जाती.
१. व्हीयतनामी ड्रगन चीकन- या कोंबड्याच्या पाय हे दिसायला मोठे असल्यामुळे याला हे नाव देण्यात आले आहे. हि जात व्हीयतनाममध्ये हनोइ येथे आढळते. व्हीयतनाम मधील राजेशाही घराण्याकरिता या कोंबड्याचे पालन पोषण होत असे.आणि विशेष म्हणजे या जातीचे कोंबडे आणि कोंबडी दोघाचेही वजन कमीत कमी ६ किलोच्या वरच असणार. हा कोंबडा जवळपास १,५०,००० रुपया पर्यंत विकल्या जातो.

२. सिल्के बंटम चिकन- हा कोंबडा किंवा शोभेची वस्तू आहे. पाळीव प्राणी म्हणून याला अनेक लोक पाळतात. कारण दिसायला हि जात आपल्या केसामुळे अतिशय सुंदर दिसते त्यामुळे हा कोंबडा किंवा कोंबडी भारतात देखील मोठ्या प्रमाणात पाळल्या जाते. हि जात मुळ चीन मधील आहे. या कोंबडीचे पिल्लू देखील ५०० रुपयात विकल्या जाते.

३. ओनागाडोरी चिकन- ओनागाडोरी हि जपान येथील जात आहे. आपल्या रुबाबामुळे या कोंबड्याला जपान मध्ये १९५२ साली राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. १७०० व्या शतकात जपान मध्ये या कोंबड्याची निर्मिती करण्यात आली होती. संपूर्ण जगात या जातीचे ओरीजनल १००० कोंबडे आहेत. भारतात देखील हा कोंबड्याची मिक्स जात ८००० रुपया पर्यंत मिळतो.

४. सुमात्रा चिकन- हि कोंबड्याची जात हि कडकनाथ प्रमाणे दिसणार. १८४६ मध्ये हे कोंबडे अमेरिका आणि युरोप मध्ये हे कोंबडे नेण्यात आले. कारण होते कोंबड्याची लढाई हे कोंबडे अतिशय आक्रमक आणि चिडखोर असतात. यांच्या लढाई मधून कमाई केल्या जाते. हा कोंबडा आता जास्त प्रमाणात आढळत नाही.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *