मुलीसोबत लग्न करणाऱ्याला थायलंडचा व्यापारी देत आहे 2 कोटी रुपये! या आहेत नियम व अटी..

वडील आपल्या मुलीसाठी नेहमीच चिंतेत राहतात. मुलीच्या बाबतीत ते खूप काळजी घेतात. मुली या घरातील लाडक्या देखील असतात. त्यामुळे त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये विशेष काळजी कुटुंबाला असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप लक्ष दिले जाते. मग आयुष्याचा जोडीदार निवडताना तर जास्त काळजी करणे हे काही वेगळं नाही.

परफेक्ट जोडीदार मिळवण्यासाठी वडील हे जमीन अस्मान एक करू शकतात. असेच एका वडिलांची गोष्ट सध्या वायरल झाली आहे. थायलंडच्या या पित्याला मुलीसाठी चांगला जोडीदार मिळाला नाही. मग त्याने यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. 58 वर्षीय अनॉथ रॉथॉग यांनी आपल्या मुलीला जोडीदार शोधण्यासाठी फेसबुकवर पोस्ट केली. 2 मार्चला त्यानी फेसबुकला पोस्ट करून आपल्या मुलीसाठी चांगला जोडीदार हवाय अशी पोस्ट केली.

Says News नुसार दक्षिण थायलंड मध्ये दुरीअन या एक प्रकारच्या फळांचा व्यापार करणाऱ्या अनॉथ यांनी फक्त साधी पोस्टच टाकली नाहीये. तर त्यांनी आपल्या जावयाला तब्बल TBH10 MILION( जवळपास 2 कोटी रुपये) देण्याची ऑफर दिली आहे. त्यांना भीती आहे की असंच जोडीदार शोधण्यात वेळ घालवला तर आपल्या मुलीचे लग्न करण्याचे वय निघून जाईल.

पैश्यांच्या व्यतिरिक्त अनॉथ यांनी आपल्या मुलीच्या भावी जोडीदाराला 1 घर, 10 गाड्या आणि दुरीअन फळांचे दोन बाजार देण्याची देखील घोषणा केली आहे. अनॉथ यांची मुलगी Karnsita ही आपल्या वडिलांना त्यांचा बिजनेस सांभाळण्यासाठी मदत करते.

या आहेत नियम व अटी-

1. मुलगा चांगला असावा आणि जुगार खेळणारा नसावा.
2. मुलगा मेहनती असावा.
3. मुलाला पैश्यांचा चांगला उपयोग करता यायला हवा.
4. मुलाला दुरीअनचा व्यापार शिकण्याची इच्छा असावी.

ही पोस्ट वायरल झाल्यानंतर अनॉथ यांना हजारो मुलांचे फोन आले आहेत. त्यांना एवढे फोन येत आहेत की त्यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे ‘मला फोन करणे बंद करा. मला आराम करायला देखील वेळ मिळत नाहीये’.

अनॉथ यांनी सर्व इच्छुकांना एक चॅलेंज दिले आहे. 1 एप्रिल ला सर्वाना बोलावले आहे. त्यांनी इच्छुकांना त्यांच्या दुरीअन च्या बिजनेस मध्ये 3 महिने सोबत काम करण्यास सांगितले आहे. जे टिकतील त्यांचा विचार केला जाणार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *