फक्त ५० हजार रुपये घेऊन १६ वर्षीय मुलाने फेकला जम्मूच्या बसस्टँडवर बॉम्ब..

७ मार्च रोजी जम्मूच्या बस स्टॅण्डवर बॉम्ब स्फोट झाला होता. या हल्ल्यात २ लोकांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड हल्ला करून हा स्फोट करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ल्याविषयी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा स्फोट घडवण्यासाठी एका छोट्या मुलाचा वापर करण्यात आला. हा मुलगा अवघा १६ वर्षीय दहशतवादी आहे. या मुलाने अवघ्या ५० हजार रुपयांसाठी बस स्टॅण्डवर बॉम्ब टाकून दोन जणांचे प्राण घेतले तर ३० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च रोजी स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून तो हिजबुल मुजाहिद्दीन साठी काम करत असल्याचे समोर आले होते. हिजबुलचा कमांडर फारुख अहमद भट्ट याच्या सांगण्यावरून त्याने बस स्टॅण्डवर हा ग्रेनेड हल्ला केला.

या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे अगोदर ग्रेनेड फेकण्याची जिम्मेदारी हि मुजमिल नामक दहशतवाद्याला देण्यात आली होती. पण त्याने नकार दिल्याने नंतर हि जिम्मेदार या ९ वि मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलाला देण्यात आली.

कोण आहे या हल्य्याचा सूत्रधार फारुख अहमद-

फारुख अहमद भट हा एक दहशतवादी असून त्याने २०१५ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन हि संघटना जॉईन केली होती. पोलिसांच्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या लिस्टमध्ये फारुख हा ए ग्रेडचा दहशतवादी आहे. जम्मू काश्मीर पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. ८ मार्चला फारुख अहमदच्या एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो अत्याधुनिक रायफल घेऊन इतर दहशतवाद्यांसोबत उभा आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *