भारताने सामना हरला असला तरी चर्चा मात्र धोनीच्या या जबरदस्त रनआऊट आणि सिक्सची!

काल रांची येथे भारत आणि ऑस्ट्रेलियदरम्यान सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ३२ धावांनी जिंकून मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दमदार फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात जबरदस्त झाली. ऍरॉन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी १९३ धावांची बलाढ्य भागीदारी केली. फिंच ९३ धावा करून बाद झाला तर ख्वाजाने १०४ धावांची शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियन संघाला भारताने शेवटच्या १५ ओव्हरमध्ये लगाम लावला.

एक क्षण असा होता जेव्हा ऑस्ट्रेलिया ३५० चा टप्पा आरामात पार करेल असे वाटत होते. पण शेवटच्या काही षटकात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फिंच आऊट झाल्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने देखील आल्या आल्याच आक्रमक फलंदाजी करायला सुरु केली. त्याने आक्रमक ४७ धावांची खेळी केली.

मॅक्सवेल आऊट नसता झाला तर ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला असता. मॅक्सवेलला धोनीने आणि जडेजाने जबरदस्त प्रकारे रन आउट केले. धोनीची करामत यामध्ये बघायला मिळाली. सोशल मीडियावर धोनीने केलेल्या या रन आऊटची जोरदार चर्चा झाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताकडून कोहलीने झुंजार शतकी खेळी खेळून सामना भारताकडे झुकवला होता. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. धोनी आणि कोहलीने चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करून भारताची वापसी केली होती.

धोनीच्या घरच्या मैदानात सामना असल्याने धोनीवर सर्वांचे लक्ष होते. धोनीने २६ धावांची खेळी केली. १९ व्या षटकातील चौथा चेंडू धोनीने 84 मीटर लांब भिरकावून दिला. या सिक्सनंतर चाहत्यांनी स्टेडियममध्येच नाचायला सुरवात केली. बीसीसीआयने धोनीच्या चाहत्यांच्या या जल्लोषाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

धोनी आणि जडेजाने केलेलं जबरदस्त रन आऊट-

धोनीने मारलेला जबरदस्त सिक्स-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *