सामना सुरु होण्यापूर्वी धोनीने का बदलल्या सर्व खेळाडूंच्या टोप्या! बघा व्हिडीओ..

महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच रांचीमध्ये भारत आज, शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. रांचीचा ‘हीरो’ असलेल्या धोनीला भारतीय संघाचा विजय हीच सर्वांत मोठी भेट ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या सा़मन्यासाठी भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात सहा गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात आठ धावांनी भारताने विजय मिळवला. त्यामुळेचं रांचीमधील तिसरी वन डे जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतली ही रांचीमधली अखेरची वन डे असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे साहजिकच या सामन्यात भारतीय क्रिकेटरसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हा धोनीच राहणार आहे.

तत्पूर्वी आज मैदानात एक आगळेवेगळे चित्र बघायला मिळाले. भारतीय संघ आजचा सामना आर्मीची कॅप घालून खेळत आहे. स्वतः महेंद्रसिंग धोनीने संघातील सर्व खेळाडूंना या कॅप दिल्या. भारतीय सैन्याला आगळीवेगळी मानवंदना यानिमित्ताने देण्यात येत आहे. तसेच पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देखील टीम इंडियाकडून देण्यात येत आहे.

सोबतच भारतीय संघाने एक अभिमानास्पद निर्णय देखील या सामन्यात घेतला आहे. भारताचा कर्णधार कोहलीने टॉसच्या वेळी याविषयी माहिती दिली. भारतीय संघ या सामन्यातील सर्व फीस राष्ट्रीय सुरक्षा निधीला देणार आहे. कर्णधार धोनीचे आर्मीविषयी प्रेम यापूर्वीही अधोरेखित झालेले आहे.

धोनी प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल देखील आहे. धोनीच्या हातानेच सर्व खेळाडूंना या कॅप देऊन धोनीचा देखील यानिमित्ताने सन्मान केला गेला. BCCI ने धोनी कॅप वाटतांनाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *