आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर पवार साहेबांनी पंकजाताई पुढे आपली फाईल सरकवली..

निवडणुका जवळ येत आहेत आणि या निवडणुकीत नेहमी लक्षात राहणारे काही किस्से येतात त्यापैकी असाच काही हा किस्सा आहे. मुंडे साहेब आणि पवार साहेबांचे राजकारणात पटले नाही परंतु राजकारणा पलीकडे त्यांनी आपले संबंध राखले. पवार साहेब आपले चिमटे काढण्याच्या अंदाजामुळे सर्वत्र परिचित आहेच असाच काही हा प्रसंग आहे.

नाशिक येथे लोकनेते गोपिनाथ मुंडे पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात इत्यादी उपस्थित होते. वसंतराव नाईक शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम मोठ्या दिमागात पार पडला. या कार्यक्रमात अनेकांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या आठवणी सांगितल्या.

आमदार जितेंद्र आव्हाड देखील या सोहळ्यास उपस्थित होते. पवार साहेब, गोपीनाथ मुंडे इत्यादी अनेक आठवणी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात सांगितल्या आणि पंकजाताईची स्तुती करताना ते बोलले कि “गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे प्रेमाचे संबंध होते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो तरी त्यांनी प्रेम कधी कमी केले नाही. तोच धागा आजही कमी झालेले नाही. पंकजाताई आणि माझे फार जवळचे संबंध नाहीत. मात्र, कधीही गेलो तरी ताईच्या कागदावरील एका साहिवर कोटी, दीड कोटी सहज मिळतात.”

पवार साहेबांनी देखील हे वाक्य आपल्या कानी पडताच आपल्या मिश्कीलपणाची दाद देत आपल्या पुढील रायटिंग पॅड तातडीने सहीसाठी पंकजा मुंडे यांच्यापुढे केला. आणि उपस्थित आणि मंचावर हास्याने सभागृह डोक्यावर घेतले. महाराष्ट्रातील राजकारणात असे अनेक किस्से आपण बघितले आहेत त्यापैकीच एक हा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणास वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

राजकारणा पलीकडे संबंध फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात आढळतात. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आपल्या कडील राजकीय किस्से तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता. आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *