बालाकोटमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे फोटो आले समोर?

भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकने खळबळ उडाली होती. भारतीय वायुदलाने तब्बल एक हजार किलो बॉम्बवर्षाव बालाकोटमध्ये केला. त्यानंतर तेथील किती दहशतवादी ठार झाले यावरून अनेक अंदाज बांधण्यात आले. पण खरोखर किती दहशतवादी ठार झाले याचा अधिकृत आकडा नसल्याचे वायुदलाने सांगितले.

काही न्यूज चॅनलवर २०० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त दाखवण्यात आले तर काहींनी ३५० दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली. तर काही लोकांनी नुकसानच झाले नाही म्हणत पुरावे देखील मागितले. त्यातच आता बालाकोटमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या मृतदेहाचे फोटो देखील आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत.

काय आहे वायरल पोस्टमध्ये-

फेसबुकवरील एका विक्रम लाखरा नामक व्यक्तीने फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये सामूहिक अंत्यसंस्काराचे फोटो आहेत. यामध्ये अजून काही फोटो आहेत. या फोटो ते मृतदेह हे एका रूममध्ये ठेवलेले दिसतात. या पोस्टला दोन हजाराहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.

विक्रम लाखराची पोस्ट

काय आहे सत्यता-

पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या एअरस्ट्राईकचे पुरावे भारतासह पाकिस्तानने आणि आंतरराष्ट्रीय मीडियाने देखील दिले आहेत. एअरस्ट्राईक झाला यात काही शंकाच नाही. पण हे दहशतवाद्यांच्या मृतदेहाचे म्हणून वायरल झालेले हे फोटो खरे नाहीयेत. बालाकोटचे म्हणून वायरल झालेले हे फोटो कराचीचे आहेत. आणि हे फोटो आताचे नसून ४ वर्षापूर्वीचे आहेत.

या फोटोविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे फोटो २७ जून २०१५ रोजीच एका न्यूजमध्ये आल्याचे समोर आले. हे फोटो पाकिस्तानमधील एका सामूहिक अंत्यसंस्काराचेच आहेत. पण हे मेलेले व्यक्ती हे ब्लॉम्बने नाही तर ऊष्माघाताने मेलेले आहेत. २०१५ मध्ये कराचीतील पारा ४५ डिग्रीच्या वर गेला होता. रमजानचा काळ होता. ऊष्माघाताने त्यावेळी एवढे मृत्यू झाले की सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा याविषयी बातमी आलेली होती. तसेच अनेक पाकिस्तानी वेबसाईटवर हे फोटो आहेत. त्यामुळे हे फोटो खोटे असल्याचे सिद्ध होते. बालाकोटचा एअरस्ट्राईक खरा असून त्यामधील मृतांचा मात्र कुठलाही अधिकृत आकडा नाहीये.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *