बालाकोट मधील हल्ल्याचा मनोरंजनासाठी बनवलेला व्हिडीओ पुरावा म्हणून व्हायरल!

अनेक दिवस झाले सर्जिकल स्ट्राईक 2 बद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. अनेकांची डोकेदुखी अजूनही सुरूच आहे. भारतीय एअरफोर्स ने बालकोट ला जाऊन बॉम्ब टाकून आले तरी काही लोकांचे आत्मे अजूनही बालकोट येथेच आहेत. दिवसरात्र बालकोट बालकोट सुरू आहे.या घटनेचे क्रेडिट घेणाऱ्या लोकांनी तात्काळ 200 ते 300 दहशतवादी मारल्याचे जाहीर पण केले.

एअरफोर्स ने देखील सांगितले की आम्ही हल्ला करतो मोजणी नाही करत. आता काही लोकांनी पुरावे मागितले तर पुन्हा गदारोळ झाला की यामुळे सैन्याच्या मनोबलाचे खच्चीकरण होते. त्यातच एक बालकोट येथे शूट केलेला मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे या व्हिडीओ मध्ये हे पाहिले तर आपल्याला व्हिडीओ मधील एक विनोदी स्क्रिप्ट दिसून येईल. यात जे दोन पत्रकार दाखवले आहेत त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून ते पत्रकार नाही वाटत. त्यामधील मुलगी डेड बॉडीज पाहून उलटी करायचे नाटक करत आहे तर बाजूलाच डेड बॉडीज चे नाटक केलेले लोक पडलेले दिसतात. त्यांच्यावर बॉम्ब काय साधा काटा लागल्याची खूण नाही. त्या दोघांच्या हातात एक बुम आहे. ज्यावर लाईट टीव्ही असे लिहिलेले आहे. या प्रकारचे कोणते चॅनल पाकिस्तान मध्ये नाहीच आहे.

या लोकांचे डायलॉग एकदम नवशीख्या कलाकाराप्रमाणे वाटतात. यातील काही डायलॉग जे अल्लाह की दया से असे बोलले आहेत ते जर पाकिस्तान मधील चॅनल असते तर मेहेरबानी हा शब्द वापरला असता. काही मजेशीर डायलॉग पाहूया..अरी यार ये कैमरा कैमरा. जल्दी लेके जाओ उसको.
– कैमरा बंद कर बे क्या है ये? इसको मत दिखा इसमें अपनी बेइज्जती हो रही..पाकिस्तान की बेइज्जती हो रही.
(लड़की द्वारा उल्टी करने की एक्टिंग)
भैया एक पैग ले आओ बना के यार.
– मेरे कपड़े फट रहे हैं.
ज्यादा कुछ उड़ाने की जरूरत नहीं है. ऐसी कुछ

वायरल झालेले व्हिडीओ-

यावरून हे व्हिडीओ हे फक्त मनोरंजनासाठी बनवले आहेत पण काही लोक हे पाकिस्तान मधील व्हिडीओ आहेत आणि हा घ्या पुरावा म्हणून व्हायरल करत आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *