२१ वर्षाच्या या मुलीने इतकी कमाई केली कि मार्क झुकरबर्गला पण टाकले मागे..

वयाच्या २१ मध्ये आपल्याला कोणी प्रश्न विचारला कि आता काय करणार आहे तर आपले उत्तर अजून शिक्षणच पूर्ण नाही केले तर काय करणार असे असेल पण याच २१ वर्षाच्या वयात कोणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होईल का ? असा प्रश्न आपल्याला विचारला तर उत्तर नाही असेल पण अशी एक व्यक्ती आहे जिने २१ व्या वर्षी अरबपती बनण्याचा पराक्रम केला आहे. तर जाणून घेऊया तिच्या बद्दल.

२१ वर्षीय काइली जेनर असे त्यामुलीचे नाव आहे. तिने अत्यंत कमी वयातच अरबपती होण्याचा मान पटकावला आहे. मार्क झुकरबर्ग हे वयाच्या २३ व्या वर्षी अरबपती बनले आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट असणाऱ्या मार्क झुकरबर्ग ला वयाच्या २३ व्या वर्षी अरबपती बनण्याचा मान मिळाला. काइली जेनर हिचा काय व्यवसाय आहे हा प्रश्न पडला असेल.

काइली जेनर हिचा सौन्दर्य प्रसाधने विकायचा व्यवसाय आहे. लिपस्टिक आणि सौन्दर्य प्रसाधने विकून ती आज जगातील सर्वात कमी वयातील अरबपती बनली आहे. काइली हिच्या कंपनीचे नाव आहे काइली कॉस्मेटिक्स. या कंपनीची आजची टोटल व्हॅल्यू हि ९०० मिलियन डॉलर आहे हि भारतीय रुपयात पाहिली तर कंपनीची व्हॅल्यू हि ६ हजार ३४० कोटी रुपये इतकी होते. आणि या कंपनी मध्ये १०० टक्के शेअर हे काइली हिचे आहेत. तसेच तीचे दुसरे हि आर्थिक सोर्स आहेत त्यामुळे फोर्ब्स च्या मते तिचे उत्पन्न १ बिलियन डॉलर च्या वर आहे.

काइली कॉस्मेटिक्स या कंपनीच्या मते गेल्यावर्षी त्यांचा ३२० मिलियन डॉलरचा व्यवसाय झाला होता. तिच्या कंपनीला हा माईलस्टोन गाठण्यासाठी ३ वर्षाचा वेळ लागला आहे. पण या अगोदरच्या सौन्दर्य प्रसाधने बनवणाऱ्या प्रसिद्ध ब्रँड ईस्टी लॉडर ला ५०० मिलियन डॉलर कमावण्यासाठी १० वर्ष लागले होते.तसेच जगप्रसिद्ध लॉरियल या ब्रँड ला या ठिकाणी पोहचण्यासाठी ८० वर्ष लागले. त्यामुळे काइली जेनिफर हिच्या यशाचा टप्पा आपल्याला सोपा नाही तर खडतर आहे याचा अंदाज आला असेल.

काइली च्या ब्रँड ला हॉलीवूड मधील स्टार्स जास्त पसंद करतात त्यामुळे ती कमी कालावधीत मोठ्या लोकांपर्यंत पोहचली.काइली हि इंस्टाग्राम वर हि प्रचंड प्रसिद्ध आहे तिला इंस्टाग्राम वर १२८ मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या पुढील व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *