अभिनंदन यांनी सांगितले- पाकिस्तान मध्ये काय काय झाले आणि कसा केला छळ..

पाकिस्तान नि अभिनंदन यांना एवढ्या आरामात सोडले असेल का ? याचा आपण कधी विचार केला का तर आता अभिनंदन यांनी खुलासा केला आहे त्यांना कश्या प्रकारे त्रास देण्यात आला आणि काय काय माहिती विचारण्यात आली. तर विंग कमांडर अभिनंदन यांच्याकडून पाकिस्तानी सैन्यांनी अनेक गोष्टीचा खुलासा करण्यासाठी दबाव टाकला. भारतीय तुकड्या कुठे तैनात आहेत, उच्च सुरक्षा क्षमता असलेली रेडीओ फ्रिक्वेन्सी इत्यादी बाबत त्यांना माहिती विचारण्यात आली.

हिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार सुधी रंजन यांनी सैन्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याकडून हि माहिती घेतलेली आहे. हे अधिकारी अभिनंदन यांच्या डीब्रीफिंगमध्ये समाविष्ट होते. अभिनंदन यांनी डीब्रीफिंग मध्ये पाकिस्तान मध्ये त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्यांना यामध्ये तिथे घडलेल्या सर्व घटना विषयी माहिती विचारण्यात आली.

भारतीय वायू दलाने २६ तारखेला जैश ए महमदच्या तळावर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याचे काही लढाऊ विमान २७ तारखेला भारतीय सीमेत आले. विंग कमांडर अभिनंदन यांनी आपल्या मिग२१ विमानाने पाकिस्तानचे एफ १६ पाडले आणि अश्या पद्धतीने ते पाकिस्तानच्या सीमेत गेले. इथे त्यांना पाकिस्तानी सैन्यांनी कैद केले.

एक मार्चला अभिनंदन अटारी-वाघा सीमेवरून भारतात परत दाखल झाले. परत आल्यानंतर झालेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितले कि विंग कमांडर अभिनंदन यांना झोपू दिले नाही, त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले आणि मारण्यात सुध्दा आले. खोट्या गोष्टी बोलण्याकरिता त्यांना खूप काळ उभे ठेवण्यात आले. मोठ मोठ्या आवाजात गाणे त्यांना ऐकवली गेली.

अभिनंदन यांच्यावर दबाव टाकण्यात आला कि भारतीय वायू सेना मेसेज पाठवायला कोणत्या फ्रीक्वेंसीचा वापर करते. तसेच फायटर जेट मधील तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिकल अरेंजमेट विषयी त्यांना माहिती विचारण्यात आली. फायटर प्लेनच्या पायलटना हे शिकविण्यात येते कि जेवढ्या वेळ होईल तेवढ्या वेळ माहिती देऊ नका कारण त्या काळात फ्रिक्वेंसी मध्ये बदल करण्यात येतो. विंग कमांडर अभिनंदनने देखील वरील प्रमाणेच केले.

वेगवेगळ्या तीन चार टीम कडून भारतीय जवान विंग कमांडर अभीनंदन यांच्या कडून अनुभव जाणून घेतले. अभिनंदनला एका जागेवर न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. अभिनंदन यांना पाकिस्तानी वायू दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले परंतु ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. सुरवातीचे काही काळ त्यांना मेडिकल सुविधा देखील उपलब्ध करून नाही दिली आणि त्यांना खूप वेळ उभे ठेवण्यात आले.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *