भाजप खासदाराने भाजपच्याच आमदाराला बुटाने हाणलं! व्हिडीओ व्हायरल..

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथल्या संतकबीरनगर जिल्हा नियोजन सभेच्या बैठकीमध्ये योगी सरकारचे प्रभारी मंत्री आशुतोष टंडन यांच्यासमोरच खासदाराने आमदाराला बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बैठकीत मेहदावलचे आमदार राकेश सिंह यांना खासदार शरद त्रिपाठी यांनी सर्वांसमोर बुटाने मारहाण केली.

विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अगोदर दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर खासदार त्रिपाठी यांनी आपला बूट काढून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील अधिकाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण खासदार प्रचंड संतापलेले होते.

नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तर खासदारांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. तर आमदार राकेश सिंह यांचे समर्थक देखील नंतर आक्रमक झाले होते. बदला घेतल्याशिवाय खासदारांना सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- सोनेचांदी गाडी घोडे मिरवणारे नगरसेवक पाहिले असतील पण हि आहे पकोडे विकणारी नगरसेविका..
हे हि वाचा- शिखच का असतात सर्वात जास्त ट्रक ड्रायवर? वाचा यामागील कारण खासरेवर

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *